आता गडचिरोलीतच आरटी-पीसीआर चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:00 AM2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:34+5:30

या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रि येसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या तीस दिवसात रात्रंदिवस सर्व कामे पुर्ण करून प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

Now RT-PCR tests in Gadchiroli itself | आता गडचिरोलीतच आरटी-पीसीआर चाचण्या

आता गडचिरोलीतच आरटी-पीसीआर चाचण्या

googlenewsNext
ठळक मुद्देप्रयोगशाळेची उभारणी पूर्ण : आठ दिवसात सुरु होणार प्रत्यक्ष स्वॅब तपासणीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आरटी-पीसीआर ही कोरोनाची महत्वपूर्ण चाचणी करणारी प्रयोगशाळा नसल्यामुळे आतापर्यंत सर्व नमुने नागपूरला पाठवावे लागत होते. मात्र आता गडचिरोलीतच सदर चाचण्या होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेची उभारणी अवघ्या ३० दिवसात करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात येत्या आठवडाभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष भेट देवून याबाबतच्या तयारीची पाहणी केली. विदर्भातील सर्वात प्रशस्त आरटी-पीसीआर प्रयोगशाळा अशी ख्याती या प्रयोगशाळेला मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रि येसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या तीस दिवसात रात्रंदिवस सर्व कामे पुर्ण करून प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुढाकार घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीनंतर व इतर आवश्यक व्यवस्थेबाबत खात्री पटल्यानंतर एम्सकडून कोरोना चाचणी तसेच इतर तपासण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या पाहणीदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी प्रयोगशाळाबाबत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंखे, डॉ.बागराज धुर्वे, महेश देशमुख, कार्यकारी अभियंता साखरवाडे उपस्थित होते.

नागपूरवरून रिपोर्ट येण्याचा वेळ वाचणार
ही आरटी-पीसीआर प्रयोगशाळा अत्याधुनिक व प्रशस्त स्वरु पात आहे. आता जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे निदान होणार असल्यामुळे नागपूरहून अहवाल येण्यास लागणारा दोन ते तीन दिवसांचा कालावधी वाचणार आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांमुळे रु ग्णांवर केली जाणारी उपचार प्रक्रि याही सोपी होईल. बांधकाम विभागाने व जिल्हा सामान्य रु ग्णालयाने अतिशय वेगाने व चांगल्या गुणवत्तेचे काम करून या लॅबची उभारणी केली आहे.

एकावेळी ११८ तपासण्यांची क्षमता
गडचिरोली जिल्ह्यात विविध आजारांबाबतच्या तपासण्या या लॅबमध्ये होणार आहेत. ही प्रयोगशाळा आरोग्य विभागासाठी चांगली उपलब्धी आहे. कोरोना महामारीत या प्रयोगशाळेमुळे तपासण्यांना गती मिळणार आहे. एकावेळी ९४ अधिक २४ अशा ११८ तपासण्या करण्याची क्षमता या अत्याधुनिक प्रयोगशाळेत असणार आहे.

Web Title: Now RT-PCR tests in Gadchiroli itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.