घराच्या बेकायदेशीर फेरफारप्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:48+5:302021-07-04T04:24:48+5:30
यावेळी त्यांनी सांगितले की, मंजूषा सतय्या वंगेवार रा. गडचिराेली हिच्या मालकीचे गाेकूलनगर येथे घर हाेते. तिच्या सांगण्यावरून आपण ते ...
यावेळी त्यांनी सांगितले की, मंजूषा सतय्या वंगेवार रा. गडचिराेली हिच्या मालकीचे गाेकूलनगर येथे घर हाेते. तिच्या सांगण्यावरून आपण ते घर ९ लाख ७० हजार रुपये किमतीला १८ डिसेंबर २०२० राेजी खरेदी केली. याबाबत वंगेवार यांनी घराचे विक्री करारनामा व त्यानंतर कब्जापत्र लिहून दिले. यावर आम्हा दाेघींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आपण ठरलेली पूर्ण रक्कम देऊन गेल्या पाच-सहा महिन्यांपासून विकत घेतलेल्या घरात वास्तव्यास आहाेत. मात्र चार महिन्यानंतर वंगेवार हिने तुला १० लाख रुपये देताे, घर परत करत. मला माेठे ग्राहक मिळाले आहेत, असे म्हणू लागली. मात्र आपण तिला घर देण्यास नकार दिला.
दरम्यान, वंगेवार हिने न.प. कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन चुकीच्या पद्धतीने घराचे फेरफार करून पुन्हा हे घर आपल्याच नावे करून घेतले. यामुळे माझी आर्थिक फसवणूक हाेत असून आपण घराची पूर्ण किंमत माेजली असल्यामुळे घराचा ताबा साेडणार नाही, असे नफिसा कुरेशी यांनी पत्र परिषदेत सांगितले. या प्रकरणाची आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती कुरेशी यांनी यावेळी दिली.
काेट
नफिसा कुरेशी व मंजूषा वंगेवार यांच्यामध्ये घर विक्रीची झालेली नाेटरी खाेटी असून वंगेवार उपस्थित नव्हत्या, असे आम्हाला संबंधित वकिलाने कळविले. त्यामुळे आम्ही यापूर्वीचा फेरफार रद्द करून नव्याने सुधारित फेरफार केला.
- संजीव ओहाेळ, मुख्याधिकारी, न.प. गडचिराेली