विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी न.प. कर्मचारी करणार आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:36+5:302021-04-01T04:37:36+5:30

गडचिराेली येथे १ एप्रिल राेजी काळ्या फिती लावून आंदाेलन, १५ एप्रिलला लेखणी बंद आंदाेलन, तसेच २५ एप्रिलपर्यंत आंदाेलनाची दखल ...

N.P. to meet various demands. Employees will protest | विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी न.प. कर्मचारी करणार आंदाेलन

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी न.प. कर्मचारी करणार आंदाेलन

Next

गडचिराेली येथे १ एप्रिल राेजी काळ्या फिती लावून आंदाेलन, १५ एप्रिलला लेखणी बंद आंदाेलन, तसेच २५ एप्रिलपर्यंत आंदाेलनाची दखल न घेतल्यास १ मे राेजी ध्वजाराेहणानंतर सर्व अत्यावश्यक सेवेसह सर्व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदाेलन करणार आहेत. याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे नगराध्यक्ष याेगीता पिपरे व मुख्याधिकारी संजीव आहाेळ यांना देण्यात आले. निवेदन देताना नगर परिषद विद्युत अभियंता व संघटनेचे शाखाध्यक्ष आनंद खुणे, मधुकर कन्नाके, अंकुश भालेराव, रवींद्र भंडारवार, स्नेहल शेंदरे, गणेश नाईक व कर्मचारी उपस्थित हाेते.

बाॅक्स

या आहेत प्रमुख मागण्या

नगर परिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थेट काेषागारामार्फत करण्यात यावे, सर्व कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणाली लागू करावी, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयाेगाचे फरक हप्ते लवकर द्यावे, राज्यातील नगरपंचायतमधील उद्घाेषणापूर्वीचे व नंतरच्या कर्मचाऱ्यांचे विना अट समावेशन करावे, २००५ नंतर नियुक्त राज्यसेवा संवर्ग, नगर परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना लागू करावी, नगर परिषदमधील अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या वेतन श्रेणीप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करून राजपत्रित दर्जा लागू करावा, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जाणार आहे.

Web Title: N.P. to meet various demands. Employees will protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.