न.प. संकुलातील व्यावसायिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:50 PM2017-10-18T23:50:24+5:302017-10-18T23:50:41+5:30

गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता.

N.P. The package's business plagues | न.प. संकुलातील व्यावसायिक त्रस्त

न.प. संकुलातील व्यावसायिक त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देदुर्लक्ष : पार्र्किं गझोन नसतानाही संकुल परिसरात रविवारी आॅटो व दुचाकींची राहते गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. २४ सप्टेंबर रोजी रविवारच्या आठवडी बाजारादरम्यान चोख पोलीस बंदोबस्तात नो पार्र्किंग झोनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आता दर रविवारी नगर पालिकेच्या संकुल परिसरात आॅटो व दुचाकी मोठ्या संख्येने उभ्या केल्या जात असल्याने व्यावसायिकांसह संकुल मागील परिसरात वस्ती असलेले नागरिक त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजारासाठी दर रविवारी गडचिरोलीत येत असल्याने आठवडी बाजारात प्रचंड गर्दी राहते. विशेष म्हणजे, गडचिरोली शहरातील आठवडी बाजार गडचिरोली-मूल या राष्टÑीय महामार्गाच्या अगदी बाजूला भरतो. बाजारासाठी आलेले नागरिक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या बाजूला ठेवत होते. दोन्ही बाजूला दुकाने, त्याच्यासमोर दुचाकी वाहने व रस्त्यावरून आठवडी बाजारातील विक्रेते तसेच नागरिकांची गर्दी यामुळे या ठिकाणी दिवसभर वाहतुकीची कोंडी होत होती. गडचिरोली शहर वाहतूक शाखेने मागील आठ महिन्यांपासून आठवडी बाजाराच्या दिवशी एसटी वगळता ट्रक व इतर मोठी वाहने शहरातून नेण्यास प्रतिबंध घातला होता. इंदिरा गांधी चौक व न्यायालय परिसरात एक वाहतूक पोलीस ठेवून या मार्गाने येणारी वाहने सेमाना मार्गे वळविली जात होती. वाहतूक शाखेचा हा प्रयोग यशस्वी झाला व याची अंमलबजावणी प्रत्येक आठवडी बाजाराच्या दिवशी केली जात आहे. मात्र शहरातून चारचाकी वाहने, बस जात असल्याने वाहतुकीची कोंडी होतच होती.
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद व शहर वाहतूक पोलीस शाखेने आठवडी बाजार परिसरातील मुख्य रस्त्याच्या बाजूचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून जाहीर केला. याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दररविवारी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. रस्त्याच्या मच्छी बाजाराच्या बाजुने लालपट्टी लावून त्यावर प्रत्येक ठिकाणी नो पार्र्किंग झोन अशी सूचना दर्शविणारे फलक लावण्यात येत आहे.
बाजार परिसरात ध्वनीक्षेपकाच्या मदतीने पार्र्किंग झोन कुठे आहे, या विषयची माहिती दिली जाते. पार्र्किंग झोनच्या कडक अंमलबजावणीने वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला. मात्र शहर व तालुक्यातील अनेक नागरिक न. प. संकुल परिसरात वाहने लावत असल्याने व्यावसायिक व गंगा नगरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहे. त्यांना रस्ता मिळत नाही.

Web Title: N.P. The package's business plagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.