एनएसयूआय आंदोलन करणार

By admin | Published: July 14, 2016 01:13 AM2016-07-14T01:13:23+5:302016-07-14T01:13:23+5:30

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

NSUI agitation | एनएसयूआय आंदोलन करणार

एनएसयूआय आंदोलन करणार

Next

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर : करिश्मा ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय
गडचिरोली : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. शिष्यवृत्ती व निर्वाह भत्त्याची प्रलंबित रक्कम, आयटीआय प्रवेश शुल्कात वाढ तसेच इतर समस्यांमुळे विद्यार्थी हैराण आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन काँग्रेस प्रणीत एनएसयूआय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार, असा एकमुखी निर्णय एनएसयूआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
बुधवारी झालेल्या या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एनएसयूआयच्या महाराष्ट्र प्रभारी करिश्मा ठाकूर होत्या. यावेळी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव पंकज गुड्डेवार, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे गडचिरोली शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआय अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना करिश्मा ठाकूर म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. भाजप प्रणीत सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. भाजपप्रणीत सरकारकडून शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. काँग्रेस व एनएसयूआय विद्यार्थ्यांवरील सदर अन्याय कधीही खपवून घेणार नाही. विद्यार्थी प्रश्नांच्या आंदोलनात एनएसयूआय च्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही ठाकूर यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याच्या गावागावात एनएसयूआयच्या शाखा स्थापन करून एनएसयूआयचे संघटन मुजबूत करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक गौरव अलाम, संचालन अमिता मडावी यांनी केले आभार विवेक घोंगडे यांनी मानले. याप्रसंगी ऐजाज शेख, सचिन राठोड, सादुलवार, अभिजीत धाईत, चैतन्य अर्जुनवार, तौफिक शेख, नचिकेत जंबेवार, कुळमेथे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: NSUI agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.