राखी पाैर्णिमानिमित्त बस फेऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:30+5:302021-08-22T04:39:30+5:30
राखी पाैर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त बहीण भावाच्या घरी किंवा भाऊ बहिणीच्या घरी राखी पाैर्णिमेसाठी जातोच. राखी ...
राखी पाैर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त बहीण भावाच्या घरी किंवा भाऊ बहिणीच्या घरी राखी पाैर्णिमेसाठी जातोच. राखी पाैर्णिमेचा सण रविवारी असला तरी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या सवडीनुसार राखीसाठी जाते. त्यामुळे जवळपास आठ दिवस बऱ्यापैकी प्रवासी मिळतात.
काेराेनामुळे एसटीची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. राखी पाैर्णिमेच्या निमित्ताने आता एसटीला उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच रविवारपासून एसटी फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
बाॅक्स
प्रवाशांची गर्दी वाढली
शनिवार असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी मिळाली. त्यामुळे काही कर्मचारी शनिवारीच गावाकडे निघाले. परिणामी बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून आली. रविवारी पुन्हा गर्दी वाढणार आहे. पुढील आठ दिवस गर्दीचा हंगाम म्हणून ओळखला जाणार आहे.
बाॅक्स
या आहेत नवीन बसफेऱ्या
अमरावती सकाळी ६ वाजता
चिमूर सकाळी ८ वाजता
भंडारा सकाळी ८ वाजता,
यवतमाळ सकाळी ७.१५, दुपारी २.३० वाजता
-यवतमाळसाठी सकाळी ६,१०, ११ वाजता व दुपारी १ वाजताच्या जुन्या फेऱ्या कायम आहेत. तसेच अमरावतीसाठी सकाळी ५.३० व गाेंदियासाठी सकाळी ७.१५ वाजताची फेरी कायम आहे.
बाॅक्स
प्रमुख मार्गांवर बसफेऱ्या वाढल्या
चंद्रपूर, नागपूर, देसाईगंज या प्रमुख मार्गांवरही बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागपूरसाठी २४ फेऱ्या, चंद्रपूरसाठी ३६ फेऱ्या, व देसाईगंजसाठीही जवळपास दर तासांनी बसफेऱ्या साेडल्या जात आहेत.
काेट
राखी पाैर्णिमेच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या वाढते ही बाब लक्षात घेऊन काही प्रमुख मार्गांवर बसफेऱ्या वाढविल्या आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुन्हा बसेस साेडल्या जातील.
- मंगेश पांडे, आगारप्रमुख, राज्य परिवहन महामंडळ, गडचिराेली