जिल्ह्यात गायी घटल्या, बकऱ्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 05:00 AM2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:00:25+5:30
शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राेजी २० वी पशुगणना करण्यात आली. त्यात गावठी गाय व बैलांची संख्या सुमारे ५१ हजार ८९२ एवढी घटली आहे. केवळ ४ लाख ४९ हजार ४३१ जनावरे शिल्लक आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : २०व्या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये गावठी गायींची संख्या सुमारे २० टक्क्यांनी घटली आहे; तर बकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे.
शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राेजी २० वी पशुगणना करण्यात आली. त्यात गावठी गाय व बैलांची संख्या सुमारे ५१ हजार ८९२ एवढी घटली आहे. केवळ ४ लाख ४९ हजार ४३१ जनावरे शिल्लक आहेत. या गायी अधिक प्रमाणात दूध देतात. २०१२ मध्ये बकऱ्यांची संख्या २ लाख ५७० एवढी हाेती. २०१९ मध्ये ती २ लाख ३९ हजार ५८७ एवढी झाली आहे.
म्हशींची संख्याही झाली कमी
१९ व्या पशुगणनेदरम्यान जिल्ह्यात म्हशींची संख्या ७६ हजार ३७२ हाेती. ती कमी हाेऊन ६६ हजार २५९ एवढी झाली आहे. प्रामुख्याने दूध व्यवसायासाठी म्हशी पाळल्या जात हाेत्या. दूध उत्पादक आता हाॅलेस्टाईन फ्रिजन या प्रकारातील गायी वापरतात.
संकरित गायींचे प्रमाण वाढले
- गावठी गायींची उत्पादन क्षमता अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांनी गावठी गायी पाळणे बंद केले आहे. त्याऐवजी ते हाॅलेस्टाईन फ्रिजन, जर्सी, आदी प्रकारच्या गायी पाळत आहेत.
- या गायी गावठी गायींच्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक दूध देतात. काही बेराेजगार युवक संकरित गायींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करतात.
मेंढ्या व काेंबड्या वाढल्या
काही पशुपालक मेंढ्या पाळतात. विशेष म्हणजे, १९ व्या जनगणनेच्या तुलनेत २० व्या जनगणनेत मेंढ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. १९ व्या पशू जनगणनेत जिल्ह्यात ७ हजार २२४ मेंढ्या हाेत्या. त्यांची संख्या २० व्या पशु गणनेदरम्यान १८ हजार ६०५ एवढी झाली आहे. काेंबड्यांची संख्या ४ लाखांनी वाढली आहे.
संकरित गायीचे दुध किती पाेषक?
- संकरित गायीचे दूध गावठी गायीच्या तुलनेत पातळ राहते. त्यामुळे त्यात गावठी गायीच्या तुलनेत कमी प्रमाणात जीवनसत्व राहतात.
- संकरित गायीचे दही, तूप गावठी गायीएवढे चविष्ट राहत नाही. दही, तूप पिवळे दिसत असल्याने गडचिराेलीतील नागरिक खरेदी करण्यास धजावत नाही.
- संकरीत गायींच्या पालन पाेषणाचा खर्च गावठी गायीच्या तुलनेत अधिक प्रमाणात आहे.