शहरात मोकाट डुकरांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:27+5:302021-02-05T08:55:27+5:30
गडचिरोली : मागील वर्षी नगर पालिकेच्यावतीने डुकरे पकडण्याची मोहीम पथकाद्वारे राबविण्यात आली होती. काही काळ मोकाट डुकरांच्या हैैदासावर नियंत्रण ...
गडचिरोली : मागील वर्षी नगर पालिकेच्यावतीने डुकरे पकडण्याची मोहीम पथकाद्वारे राबविण्यात आली होती. काही काळ मोकाट डुकरांच्या हैैदासावर नियंत्रण मिळाले होते. परंतु आता जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक वॉर्डात मोकाट डुकरांचा हैैदोस वाढला असल्याने डुकरे पकडण्याची मोहीम पुन्हा राबवावी, अशी मागणी नागरिकाकंडून होत आहे.
शहरातील विविध वॉर्डात कळपाने लहान-मोठी डुकरे फिरत असतात. यामुळे लहान मुले, वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा ही डुकरे नागरिकांच्या अंगणात प्रवेश करून घाण पसरवित असतात. नालीतील चिखलात लोळून तसेच इकडे-तिकडे हुंदडत असतात. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील कोणत्याही वॉर्डात गेल्यास डुकरांचा सामना करावा लागतो. डुकरांच्या कळपात सापडण्याचा व अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.