काेराेना रुग्णांची संख्या पाेहाेचली २० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:58+5:302021-09-22T04:40:58+5:30
काेराेना रुग्णांची संख्या १३ पर्यंत कमी झाली हाेती. त्यावेळी जिल्हा लवकरच काेराेनामुक्त हाेईल, अशी अपेक्षा जिल्हावासीय करीत हाेते. मात्र, ...
काेराेना रुग्णांची संख्या १३ पर्यंत कमी झाली हाेती. त्यावेळी जिल्हा लवकरच काेराेनामुक्त हाेईल, अशी अपेक्षा जिल्हावासीय करीत हाेते. मात्र, रुग्णांची संख्या कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची संख्या अशी कमी वा जास्त हाेत असल्यानेच शासन आठवीच्या पहिलीच्या शाळा उघडण्यास तयार नाही. बाजारपेठेत गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेण्याची गरज आहे, अन्यथा पुन्हा लाॅकडाऊनचे संकट काेसळण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
मंगळवारी ३ रुग्णांची भर
मंगळवारी जिल्ह्यात ८३३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३ कोरोनाबाधितांची भर पडली. एकाही जणाने काेराेनावर मात केली नाही. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २० झाली आहे. आत्तापर्यंत बाधितांची संख्या ३० हजार ७६३ झाली आहे. त्यापैकी २९ हजार ९९७ जणांनी काेराेनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण ७४६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५२ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.०७ टक्के, तर मृत्यू दर २.४२ टक्के झाला. नवीन कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली १ ,सिरोंचा १,वडसा १ यांचा समावेश आहे.