सेवाविषयक प्रश्नांसाठी नर्सेसचे आजपासून उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:04+5:302021-07-01T04:25:04+5:30
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत नर्सेस भगिनी ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी दुर्गम भागात कार्यरत आहेत. काेराेना संसर्गाची भीती ...
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत नर्सेस भगिनी ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी दुर्गम भागात कार्यरत आहेत. काेराेना संसर्गाची भीती असतानाही नर्सेस आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. काम करीत असताना आरोग्य सेविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे नर्सेस संघटनेच्या वतीने १ जुलै राेजी जिल्हा परिषदेसमाेर बेमुदत उपाेषण केले जाणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बाॅक्स
या आहेत प्रमुख मागण्या
नर्सेस संवर्गातील कर्मचाऱ्यांना लवकर पदोन्नती द्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांना सुधारित जॉब चार्ट द्यावा. एन.सी.डी. कार्यक्रमाची जबाबदारी सीएचओ ह्यांना द्यावी. उपकेंद्रात प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित असावे. स्वतंत्र डाटा ऑपरेटर नेमावे, उर्वरित नर्सेसला स्थायी व नियमित करावे तसेच कालबध्द पदोन्नती द्यावी. प्रशिक्षण पथकात दोन एल.एच.व्ही.ची पदे प्रतिनियुक्तीवर भरावी. सेवापुस्तक अद्ययावत करावे. सार्वजनिक सुटी किंवा साप्ताहिक सुटीच्या दिवशी कुटुंब कल्याण शिबिरे सभा मेळावे घेण्याची पध्दत रद्द करावी. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांचा गाैरव करावा. कंत्राटी आरोग्य सेविकांची स्पर्धा परीक्षा न घेता थेट समायोजन करावे, आदी प्रमुख मागण्या आहेत.