अन्यायाविरोधात ओबीसी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:31 AM2018-10-18T01:31:24+5:302018-10-18T01:31:53+5:30
निवडणुकीपूर्वी पुढाऱ्यांनी दिलेले जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षाविरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : निवडणुकीपूर्वी पुढाऱ्यांनी दिलेले जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षाविरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान ओबीसी बांधवांनी वेगळा राजकीय पर्याय काढून आपल्या हक्कासाठी ताकद दाखवावी, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व संघटनेच्या विविध पदाधिकाºयांनी सभेत काढला.
देसाईगंज तालुका राष्टÑीय ओबीसी महासंघाच्या वतीने रविवारी देसाईगंज तालुक्याच्या आमगाव येथील राम मंदिरात ओबीसी समाजाची सभा पार पडली. यावेळी ओबीसींचे आरक्षण व विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी व बांधवांनी व्यक्त केलेल्या मतातून देसाईगंज तालुक्यातील ओबीसी बांधव एकवटले असल्याचे दिसून आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी धनपाल मिसार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, राष्टÑीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, मुरलीधर सुंदरकर, ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रूचित वांढरे, चौधरी, मस्के, पं.स.सदस्य अर्चना ढोरे, विसोराच्या सरपंच मंगला देवढगले, आमगावचे सरपंच योगेश नाकतोडे, सावंगीचे सरपंच राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, प्रा.दामोधर शिंगाडे, कमलेश बारस्कर, श्यामराव तलमले, नगरसेवक सचिन खरकाटे, राजेंद्र गुल्ले, प्रभाकर चौधरी, महेश झरकर, लोकमान्य बरडे, ज्ञानेश्वर पिल्लारे, ज्ञानेश्वर कवासे, गौरव नागपुरकर, सुनील पारधी, चैतनदास विधाते, अरूण राऊत, सागर वाढई, विलास ठाकरे, विष्णू नागमोती, शंकर पारधी, प्रशांत देवतळे, विनायक अलोणे, दीपक प्रधान, प्रदीप तुपट, पंकज धोटे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ओबीसींचे विविध प्रश्न मार्गी लावण्याबाबत विद्यमान लोकप्रतिनिधी व यापूर्वीच्याही सत्ता पक्षातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. त्यामुळे विविध पक्षात असलेल्या ओबीसी पदाधिकाºयांनी पक्षातील व निवडून आलेल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा सूर यावेळी काढण्यात आला.
संचालन व आभार विष्णू दुनेदार यांनी मानले. यशस्वीतेसाठी राष्टÑीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.