ओबीसीच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटाेले यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:48 AM2021-02-25T04:48:21+5:302021-02-25T04:48:21+5:30

गडचिराेली : ओबीसी संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले यांची भेट घेऊन त्यांना ओबीसींच्या ...

OBC delegation called on Nana Patel | ओबीसीच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटाेले यांची भेट

ओबीसीच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटाेले यांची भेट

Next

गडचिराेली : ओबीसी संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले यांची भेट घेऊन त्यांना ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.

निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे, आ. अभिजित वंजारी, महेंद्र ब्राम्हणवाडे व इतर ओबीसी पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी ओबीसींचे आरक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह, पदभरती आदींबाबत आ. पटाेले यांच्याशी चर्चा करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ओबीसीचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ओबीसी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण अनुसूचित क्षेत्रातून गैर आदिवासींची लोकसंख्या जास्त असणारी गावे वगळावी, आदी विविध मागण्या कायम आहेत.

गडचिरोली येथे २२ फेब्रुवारी ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार होता; परंतु काेराेनाचा उद्रेक वाढल्याने समाजहित लक्षात घेऊन हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. असे असले तरी जोपर्यंत जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत पदभरती करण्यात येऊ नये, असे सूचित करण्यात आले.

Web Title: OBC delegation called on Nana Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.