ओबीसी महामाेर्चा निघणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:00 AM2021-02-15T05:00:00+5:302021-02-15T05:00:42+5:30
ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्चा निघणार की नाही, याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात हाेत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ओबीसी समन्वय समितीची तातडीची बैठक रविवारी पार पडली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाचे कारण पुढे करीत पाेलीस प्रशासनाने माेर्चाला परवानगी देण्यास नकार दिला असला तरी २२ तारखेचा नियाेजित माेर्चा निघेलच, असा निर्धार १४ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या ओबीसी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत व्यक्त केला आहे.
२२ तारखेचा ओबीसींचा माेर्चा ऐतिहासिक व्हावा, यासाठी ओबीसी समाज संघटना मागील १५ दिवसापासून कामाला लागली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्चा निघणार की नाही, याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात हाेत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ओबीसी समन्वय समितीची तातडीची बैठक रविवारी पार पडली.
या बैठकीत माेर्चाविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांनी माेर्चा निघेलच, असा सर्वानुमते निर्णय घेतला. माेर्चा अतिशय शांततेत काढला जाईल, माेर्चेकरी काेराेना प्रतिबंधाविषयीचे नियम पाळतील. यादृष्टीने प्रयत्न केले जातील. शांततेच्या मार्गाने सरकारला ओबीसी समाजाची ताकद, ऐक्य दाखवायचे आहे. त्यादृष्टीने सर्व ओबीसी बांधवांनी मनात काेणतीही शंका न बाळगता माेर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या सदस्यांनी केले आहे. बैठकीला जिल्हाभरातील ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी हजर हाेते.
शेतकरी माेर्चालाही परवानगी नाही
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काेणत्याच माेर्चाला परवानगी देत नाही. एवढेच नाही तर दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या माेर्चालासुद्धा परवानगी नाही, तरीही हा माेर्चा मागील महिनाभरापासून सुरू आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या कालावधीत एकाही माेर्चाला परवानगी नव्हती. तरीही हजाराेच्या संख्येतील माेर्चे काढण्यात आले आहेत. एकाही माेर्चेकऱ्यावर प्रशासनाने कारवाई केली नाही. उलट पाेलीस बंदाेबस्त ठेवून माेर्चा शांततेत पार पडेल, यासाठी सहकार्य केले असल्याचे दिसून येते. ओबीसी समाज संघटनेने माेर्चाची परवानगी मागितली हाेती. त्याला उत्तर म्हणून प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. हा एक नियमाचा भाग आहे. मात्र याला ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये. पाेलीस विभाग व इतर विभागसुद्धा माेर्चा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करतील, अशी अपेक्षा बैठकीतील सदस्यांनी व्यक्त केली आहे.