ओबीसींचे आरमोरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:06+5:302021-06-25T04:26:06+5:30

आरमोरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण, तसेच ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी ...

OBC protests in front of Armori tehsil office | ओबीसींचे आरमोरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

ओबीसींचे आरमोरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

Next

आरमोरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण, तसेच ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गुरुवारी आरमोरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष चेतन भोयर, उपाध्यक्ष प्रवीण ठेंगरी, सचिव मिथुन शेबे, संदीप राऊत, मनीष राऊत, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, गुलाब मने, आशिष मने, विलास गोंदोळे, मधुसूदन चौधरी, मंजूषा दोनाडकर, रिंकू झरकर, विजय सुपारे, प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे, हरेष बावनकर, पंकज खरवडे, जितू ठाकरे, कृष्णा खरकाटे, संध्या टीचकुले तसेच महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष विनोद पटोले, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, वामनराव सावसागडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या मनीषा दोनाडकर, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक वाकडे, मिलिंद खांदेशकर, रोशनी बैस, शालिकराम पत्रे, डॉ. संगीता रेवतकर, इत्यादी उपस्थित होते.

===Photopath===

240621\img-20210624-wa0056.jpg

===Caption===

आरमोरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करतानाराष्ट्रीय ओबीसी महासंगाचे पदाधिकारी

Web Title: OBC protests in front of Armori tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.