ओबीसी आरक्षणासाठी शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:21 AM2018-11-25T00:21:17+5:302018-11-25T00:21:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात आजवर रस्त्यावर उतरून कष्टकरी कामगारांचे अनेक लढे यशस्वीपणे लढले असून ...

For the OBC reservation, farmers' workers party will be struggling on the road | ओबीसी आरक्षणासाठी शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणार

ओबीसी आरक्षणासाठी शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात आजवर रस्त्यावर उतरून कष्टकरी कामगारांचे अनेक लढे यशस्वीपणे लढले असून जिल्ह्यातील ओबीसींच्या हक्कासाठी शेकाप रस्त्यावरची लढाई लढणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केले. ते खंडाळा येथील नवयुवक मंडळाद्वारा कार्तिक एकादशी निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे,रमेश चौखुंडे, राजू केळझरकर,प्रदिप आभारे, माजी पं.स.सदस्य प्रमोद भगत, सेलोकर, भेंडाळाचे पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, घारगावचे पोलीस पाटील आभारे, गुरुदेव सातपुते जानकीराम ढोबे, नरेश पोरटे, नोमाजी सातपुते, प्रमोद गोलार्वार, भैय्याजी मंगर, बालाजी झोडक उपस्थित होते.
रामदास जराते पुढे म्हणाले, ओबीसींच्या हक्कासाठीचे आंदोलन तिव्र करण्याची गरज असून मोठ्या संख्येने तरुणांनी रस्त्यावर उतरावे, या संघषार्साठी लागणारी राजकीय ताकद शेकाप पुरवेल तसेच येणाऱ्या काळात विधिमंडळात जिल्ह्यातून ओबीसींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूकीचे राजकारण करेल, असे जराते म्हणाले. यावेळी सेलोकर गुरुजी, प्रमोद भगत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उंदिरवाडे तर प्रास्ताविक गुरुदेव सातपुते यांनी केले.

Web Title: For the OBC reservation, farmers' workers party will be struggling on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.