ओबीसींच्या मागण्यांसाठी राष्टÑीय स्तरावर लढा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:24 AM2017-08-04T00:24:03+5:302017-08-04T00:24:45+5:30
राज्य घटनेने ओबीसींना दिलेल्या अधिकारांवर घाला घालण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य घटनेने ओबीसींना दिलेल्या अधिकारांवर घाला घालण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात आहे. ओबीसींच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण राष्टÑीयस्तरावर लढा देऊ या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी यावर्षी दिल्ली येथे द्वितीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ओबीसींच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी राष्टÑीय ओबीसी महासंघाची स्थापना करण्यात आली. या महासंघाचे पहिले अधिवेशन मागील वर्षी ७ आॅगस्ट रोजी नागपूर येथे संपन्न झाले. या महासंघाच्या वतीने दिलेल्या लढ्यामुळे फि शीपची मर्यादा वाढविली आहे. ओबीसीसाठी राज्य शासनाने स्वतंत्र मंत्रालय सुरू केले आहे. या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी इतर अनेक मागण्यांसाठी लढता द्यायचा आहे.
ओबीसी समाजाची जनगणना घोषीत करून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, मंडल आयोग, नचिपन आयोग व स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, ओबीसी कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, तहसील न्यायालयापासून सर्वोच्च न्यायलयापर्यंत सर्व न्यायीक स्तरांवर ओबीसींना आरक्षण लागू करावे, ओबीसी प्रवर्गाचा अॅक्ट्रोसिटी कायद्यामध्ये समावेश करावा, ओबीसी शेतकºयांवर वनहक्क क्षेत्रासाठी लागू केलेली तीन पिढ्यांची अट रद्द करावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात तसेच परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक राज्य व जिल्हास्तरावर प्रशिक्षण संस्था सुरू करावी, राष्टÑीय व इतर मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा द्यावा आदी मागण्यांसंदर्भात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रा. शेषराव येलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला दादाजी चापले, दादाजी चुधरी, पांडुरंग घोटेकर, एस. टी. विधाते, खुशाल वाघरे, अरूण मुनघाटे, कुणाल पडालवार, प्राचार्य डॉ. भुपेश चिकटे, गोविंदराव बानबले आदी उपस्थित होते.
गडचिरोलीतून दिल्लीला २०० जण जाणार
राष्टÑीय ओबीसी महासंघाचे दुसरे अधिवेशन दिल्ली येथे ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती तथा राष्टÑीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरय्या यांच्या हस्ते केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय श्रम मंत्री बंडारू दत्तात्रेय, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री अशोक गलहोत, रेल्वे राज्यमंत्री राजेश गोहाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, पशु व दुग्ध मंत्री महादेव जानकर, खासदार हुकूमदेव यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला गडचिरोली येथून २०० नागरिक जाणार आहेत.