कर्जमाफीच्या १८३ अर्जांवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:34 PM2017-10-09T23:34:28+5:302017-10-09T23:34:45+5:30
चावडी वाचनादरम्यान जिल्हाभरातील १८३ कर्जमाफीच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चावडी वाचनादरम्यान जिल्हाभरातील १८३ कर्जमाफीच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत.
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक करण्यात आले होते. जिल्हाभरातील ६५ हजार ६४९ शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, असे शासनाने घोषित केले असतानाही काही शासकीय कर्मचाºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. चावडी वाचनादरम्यान गावातील नागरिकांनी संबंधितांच्या अर्जावर आक्षेप घेतले. २९ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. यामध्ये १८३ अर्जांवर नागरिकांनी आक्षेप घेऊन सदर अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.
काही शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले, मात्र त्यांची नावे यादीमध्ये नसल्याने काही गावांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ज्या शेतकºयांनी अर्ज केला आहे, मात्र यादीमध्ये नाव नाही, अशा शेतकºयांना तहसीलदारांकडे केलेल्या अर्जाची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने पुन्हा नवीन सॉप्टवेअर तयार केले असून यामध्ये शेतकºयांची तीन याद्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील हिरव्या रंगाची यादी पात्र लाभार्थ्यांची राहणार आहे. पिवळ्या रंगाच्या यादीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरविलेले अर्जदार तर लाल रंगाच्या यादीमध्ये कायमस्वरूपी अर्ज रद्द केलेल्या नागरिकांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लावण्यात आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. ५० गावांमध्ये अजूनही चावडीवाचन झाले नाही. काही गावांमध्ये चावडीवाचन झाले आहे
तहसीलदारांकडेही नोंदविता येणार आक्षेप
काही गावांमध्ये नागरिकांनी अर्जांबाबत तोंडी आक्षेप नोंदविले आहेत. तोंडी आक्षेप ग्राह्य धरले जाणार नसून त्यासाठी संबंधित व्यक्ती कसा अपात्र आहे, याबाबतचे योग्य पुरावे जोडणे आवश्यक आहे. पुराव्याअभावी अपात्र व्यक्ती पात्र व्यक्तीच्या यादीत येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संबंधित अपात्र व्यक्तीचा पुरावा जोडावा, असे आवाहन प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले आहे. १२ आॅक्टोबरपासून तालुकास्तरावर याद्या बनविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे ११ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे याबाबतचे आक्षेप नोंदविता येणार आहे.