खरेदी-विक्री व बांधकामावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 08:58 PM2017-12-28T20:58:34+5:302017-12-28T20:58:45+5:30

नगरपालिकेच्या विकासकामांबाबतची आमसभा मंगळवारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व अनेक विकास कामे या मुद्यावर ही आमसभा चांगलीच गाजली.

Objection to the sale and purchase | खरेदी-विक्री व बांधकामावर आक्षेप

खरेदी-विक्री व बांधकामावर आक्षेप

Next
ठळक मुद्देपालिकेच्या सभेत गाजला मुद्दा : आमसभेत अनेक ठराव फेटाळले; विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांचाही विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगरपालिकेच्या विकासकामांबाबतची आमसभा मंगळवारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीचे व्यवहार व अनेक विकास कामे या मुद्यावर ही आमसभा चांगलीच गाजली.
विशेष म्हणजे ठरावांना विरोधकांसोबत सत्ताधारीही विरोध करीत असल्याचे अजब चित्र दिसले. नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आमसभेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, मुध्याधिकारी कृष्णा निपाने तसेच सर्व नगरसेवक, पालिकेचे विभागप्रमुख उपस्थित होते.
शहराच्या विकासात्मक कामाबाबतचा ठराव घेऊन सर्वानुमते पारित करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अनेक प्रस्ताव नगरसेवकांना विश्वासात न घेता करण्यात आले आहेत, असा आरोप करीत अनेक ठराव पुढील आमसभेत ढकलण्यात आले. नागरिकांमधून शहराच्या विकासात्मक कामाबाबत ओरड सुरू आहे. नागरिकांचा आरोप आहे की, शहराचा विकास कासवगतीने करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांना वेग देण्याकरिता आमसभेकडे पाहिले जात होते. मात्र या आमसभेत नगरसेवकांनी अनेक ठराव फेटाळून लावले. त्यामुळे या विकास कामांना वेग न येता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वात्सविक या आमसभेत विरोधी पक्षाचे दोन नगरसेवक सोडले तर सर्वच नगरसेवक सत्ताधारी भाजप पक्षाचे आहेत. तसेच नगराध्यक्ष व सभापतीदेखील भाजपाचे आहेत. त्यामुळे कोणताही प्रस्ताव सर्वानुमते पारित होण्यास कोणतीही अडचण सभागृहाला नसावी. मात्र मंगळवारच्या आमसभेत विपरित चित्र पहावयास मिळाले. थेट विरोधी नगसेवकांनासह सत्ताधारी नगरसेवकांनीदेखील ठरावाला विरोध केला.
मंगळवारी झालेल्या नगर परिषदेची आमसभा चांगलीच गदारोळात पार पडली. आमसभेमार्फत ठराव पारित करून करण्यात आलेल्या विकास कामांवर खिळ बसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक खरेदी-विक्रीचे तसेच बांधकामाची कामे परस्पर करण्यात येत असल्याचेही सत्ताधारी नगरसेवकांनी आमसभेत मांडले. यापुढे सर्व प्रस्तावांची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात यावी, अशी विनंती देखील सर्व नगरसेवकांनी अध्यक्षांना केली. या आमसभेत बराच वेळ गदारोळ दिसून आला.
पालिकेच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर
गडचिरोली नगर पालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्त्ता आली. या पालिकेत तीन स्वीकृत सदस्य भाजपाचे आहेत. केवळ एक नगरसेवक काँग्रेस व एक नगरसेवक रासपचा आहे. २५ पैकी २३ नगरसेवक भाजपचे आहेत. अशा परिस्थितीत शहरातील विकास कामांना व विकासाच्या नियोजनाला गती मिळण्याची अपेक्षा गडचिरोलीकरांनी निवडणुकीनंतर केली होती. मात्र शहरात विकास कामाला गती दिसून येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकासह सत्ताधारी नगरसेवकांकडूनही पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Objection to the sale and purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.