उंचीवर आक्षेप, दाेघांची नागपुरात हाेणार पुनर्माेजणी; चेन्नईवरून उपकरणासह येणार चमू

By गेापाल लाजुरकर | Published: January 30, 2024 09:28 PM2024-01-30T21:28:27+5:302024-01-30T21:32:25+5:30

जिल्हा पाेलिस भरतीत २०२३ मध्ये प्रदीप मल्लेलवार व सुभाष गुट्टेवार या दाेघांची अंतिम निवड झाली हाेती.

Objections to height, re-arrangement of two to be held in Nagpur | उंचीवर आक्षेप, दाेघांची नागपुरात हाेणार पुनर्माेजणी; चेन्नईवरून उपकरणासह येणार चमू

उंचीवर आक्षेप, दाेघांची नागपुरात हाेणार पुनर्माेजणी; चेन्नईवरून उपकरणासह येणार चमू

गडचिराेली : जिल्हा पाेलिस भरतीत २०२३ मध्ये प्रदीप मल्लेलवार व सुभाष गुट्टेवार या दाेघांची अंतिम निवड झाली हाेती. परंतु त्यांच्याबाबत पाेलिस विभागाला आक्षेप प्राप्त झाल्यानंतर त्यांची पुनर्माेजणी करण्यात आली. यात ते अपात्र आढळल्याने त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले. याला दाेघांनीही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिल्याने दाेन्ही उमेदवारांची पुनर्माेजणी चेन्नई येथील चमूद्वारे ६ फेब्रुवारी राेजी नागपुरात हाेणार आहे.

मल्लेलवार व गुट्टेवार यांच्या उंचीबाबत आक्षेप प्राप्त झाल्यानंतर पाेलिस अधीक्षक कार्यालयाने दाेघांनाही सेवेत नाकारले हाेते. तेव्हा दाेन्ही उमेदवारांनी नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. त्यामुळे गृह मंत्रालय आणि जिल्हा पाेलिस अधीक्षकांना न्यायालयाने नाेटीस बजावली हाेती.

२३ जानेवारी राेजी न्यायमूर्ती अविनाश घराेटे व न्यायमूर्ती एम.एस. जवाळकर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत दाेन्ही उमेदवारांची पुनर्माेजणी करण्याची विनंती स्वीकारली. उंची माेजण्यासाठी चेन्नई येथून माेजमापाच्या उपकरणासह अधिकाऱ्यांची चमू नागपूर येथे बाेलावण्याचे आदेश दिले. त्यानुसार ६ फेब्रुवारी २०२४ राेजी दाेन्ही याचिकाकर्त्यांची पुनर्माेजणी हाेणार आहे. दाेन्ही याचिकाकर्त्यांची बाजू ॲड. कविता माेहरकर व ॲड. दावडा यांनी नागपूर खंडपीठात मांडली.

३० हजार रुपयांचा खर्च

पाेलिस भरतीत उमेदवारांची उंची मोजण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे तसेच चेन्नई येथून येणाऱ्या पथकासाठी २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च भागवण्यासाठी दाेन्ही याचिकाकर्त्यांकडून संयुक्तपणे ३० हजार रुपये २९ जानेवारीपर्यंत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. दाेघांनीही ही रक्कम अदा केली असल्यामुळे त्यांची पुनर्माेजणी हाेणार आहे.

Web Title: Objections to height, re-arrangement of two to be held in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.