व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:15+5:302021-04-09T04:38:15+5:30

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत ...

Obstruction of traffic by professionals | व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा

व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा

Next

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.

वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सदर वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे.

औद्योगिक वसाहती स्थापन करा

गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा

आरमाेरी : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे खोदले आहेत.

शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवा

अहेरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युत तारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरिता तारा हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या वेळी मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

कमलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.

वन जमिनीवर अतिक्रमण वाढतीवर

आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागांत अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

कोरची : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. ग्रामीण भागातील शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारत आहेत.

अवैध लॉटरी केंद्रांचा व्यवसाय फोफावला

देसाईगंज : शहरात परवानाप्राप्त लॉटरी केंद्रे आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी परवाना नसलेली अवैध लॉटरी केंद्रे खुलेआम सुरू आहेत. पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे कायम दुर्लक्ष होत आहे.

बेरोजगारांना कर्ज द्या

कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळण्याच्या उद्देशाने ‘मुद्रा लोन योजना’ या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रांवर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत.

शेड उभारण्याची मागणी

गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराचा चामोर्शी मार्गावर थांबा देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी शेड नसल्याने प्रवासी भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. सदर बसथांब्यावरून अनेक प्रवासी चामोर्शी, अहेरीकडे ये-जा करतात.

सिंचन विहिरीऐवजी बोअर खोदून द्या

चातगाव : शासनामार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. या विहिरींना बोअरची गरज आहे.

Web Title: Obstruction of traffic by professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.