पुलावरून पडून वृध्द इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:48+5:302021-01-25T04:37:48+5:30

पेरमिली : पुलावरून खाली पडून वृध्द इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २४ जानेवारीला उघडकीस आली. मलय्या आशन्ना वनपाकलवार (६०) ...

Old Isma dies after falling from bridge | पुलावरून पडून वृध्द इसमाचा मृत्यू

पुलावरून पडून वृध्द इसमाचा मृत्यू

googlenewsNext

पेरमिली : पुलावरून खाली पडून वृध्द इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २४ जानेवारीला उघडकीस आली. मलय्या आशन्ना वनपाकलवार (६०) रा. पेरमिली असे मृतक इसमाचे नाव आहे. मलय्या हा २२ जानेवारीच्या सायंकाळपासून बेपत्ता हाेता. त्याच्या घरचे कुटुंबिय व नातेवाईक तीन दिवसांपासून त्याचा शाेध घेत हाेते. मात्र शाेध लागला नाही. रविवारी सकाळच्या सुमारास गावाजवळ असलेल्या नाला परिसरात काही नागरिक शाैचास गेले असता, पुलाखाली वृध्द इसम मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेबाबत गावात माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, बेपत्ता असलेल्या मलय्याचे शव दिसून आले. त्यानंतर लगेच पेरमिली पाेलिसांना कळविण्यात आले. पाेलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंड आहेत.

Web Title: Old Isma dies after falling from bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.