नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 05:00 AM2022-03-26T05:00:00+5:302022-03-26T05:00:19+5:30

गडचिराेली नगर परिषदेची यावर्षीची मालमत्ताकराची मागणी २ काेटी ५० लाख ३९ हजार २०३ रूपये आहे. तर थकबाकी ४ काेटी ४२ लाख ९७ हजार ५६६ एवढी आहे. दरवर्षीच्या थकबाकीच्या तुलनेत जुनी थकबाकी दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. एकूण मागणी ६ काेटी ९३ लाख ३६ हजार ७७५ रूपये एवढी आहे. २४ मार्चपर्यंत ३ काेटी २७ लाख ९ हजार ६४४ रूपये एवढी वसुली झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ४७ टक्के एवढे आहे. 

Older arrears doubled than regular property taxes | नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट

नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दाेन वर्षे चाललेल्या काेराेना साथीचा माेठा परिणाम गडचिराेली नगर परिषदेच्या मालमत्ताकराच्या वसुलीवर झाला आहे. मालमत्ताकराची थकबाकी मागील वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे. नियमित मालमत्ताकराच्या मागणीपेक्षा थकबाकीची रक्कम दाेन पट अधिक आहे. कराची वसुली करताना कर्मचाऱ्यांची दमछाक उडत आहे.
मालमत्ताकर हे नगर परिषदेचे स्वत:च्या उत्पन्नाचे साधन आहे. या उत्पन्नाचा उपयाेग नगर परिषद स्वत:च्या गरजेप्रमाणे वापरते. त्यामुळे या कराच्या वसुलीला फार महत्त्व असल्याने जास्तीत जास्त करवसुली हाेईल, याकडे नगर परिषदेचे प्रशासन प्रयत्न करीत राहते. काेराेना साथीच्या पूर्वी या कराची वसुली दरवर्षीच्या मागणीच्या जवळपास ८० टक्के राहत हाेती. मात्र, काेराेना साथीमुळे शहरातील अनेकांचे राेजगार गेले. याचा थेट परिणाम मालमत्ताकराच्या वसुलीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. 
गडचिराेली नगर परिषदेची यावर्षीची मालमत्ताकराची मागणी २ काेटी ५० लाख ३९ हजार २०३ रूपये आहे. तर थकबाकी ४ काेटी ४२ लाख ९७ हजार ५६६ एवढी आहे. दरवर्षीच्या थकबाकीच्या तुलनेत जुनी थकबाकी दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. एकूण मागणी ६ काेटी ९३ लाख ३६ हजार ७७५ रूपये एवढी आहे. २४ मार्चपर्यंत ३ काेटी २७ लाख ९ हजार ६४४ रूपये एवढी वसुली झाली आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ४७ टक्के एवढे आहे. 

दाेन पथकांची नियुक्ती 
मागील तीन महिन्यांपासून मालमत्ताकराची वसुली करण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत आहे. यासाठी दाेन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात सात ते आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी जाऊन मालमत्ताकराची वसुली करीत आहेत.  

काही मालमत्तांना ठाेकले सील

-    काही व्यावसायिकांकडे लाखाे रूपयांचा मालमत्ताकर थकीत हाेता. मात्र, ते वेगवेगळी कारणे सांगून कर भरत नव्हते. परिणामी, त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय पर्याय नव्हता. नगर परिषदेने आरमाेरी मार्गावरील एक मंगल कार्यालय तसेच एका दुकान गाळ्यांना सील ठाेकले. सील ठाेकताच संबंधितांनी कराचा भरणा नगर परिषदेत केला. त्यानंतर सील उघडण्यात आले.

नवीन नाेंदणीचे काम खासगी संस्थेकडे 
नवीन घराचे घरटॅक्स सुरू करायचे असल्यास त्याची पाहणी करण्याचे काम आता खासगी संस्थेला साेपविले आहे.

 

Web Title: Older arrears doubled than regular property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर