वन विभागाच्या शोधमोहिमेने वृद्ध महिलेला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:57 PM2018-11-25T21:57:14+5:302018-11-25T21:57:35+5:30

झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून आली.

Older Life Livelihood | वन विभागाच्या शोधमोहिमेने वृद्ध महिलेला जीवनदान

वन विभागाच्या शोधमोहिमेने वृद्ध महिलेला जीवनदान

Next
ठळक मुद्देरात्रभर होती पडून : जंगलात गेलेली महिला पडली बेशुद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून आली.
आरमोरी वन परिक्षेत्रात येणाऱ्या पाथरगोटा येथील ६५ वर्षीय गोपिका नामदेव चौधरी ही वृध्द महिला २४ तारखेला सकाळी गावालगतच्या जंगलात झाडूचे गवत आणण्यासाठी गेली असता, ती परत आली नाही. सदर बाब वाºयासारखीच पसरताच गावकºयांनी सायंकाळच्या दरम्यान वृध्द बेपत्ता महिलेला शोधण्यासाठी शोध मोहीम राबविली. मात्र महिलेचा शोध लागला नाही. सदर जंगल क्षेत्रात वन्यप्राणी वाघ व बिबटाचा वावर असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चर्चेला पेव फुटले होते. या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांनी वन कर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार केले. गावकऱ्यांच्या मदतीने रविवारी सकाळी १० वाजेपासून शोधमोहीम राबविली. दुपारी २.४५ वाजता सदर महिला बेशुध्दा अवस्थेत सापडली. लागलीच तिला आरमोरी येथील रूग्णालयात दाखल केले.
शोध मोहीमेमुळे महिलेला जीवदान मिळाले आहे. वन विभागाच्या पथकात रमेश गोटेफोडे, विकास मेश्राम, संतोष तिजारे, सलिम सय्यद, कमलेश गिन्नलवार, छगण सपाटे, विजय जनबंधू, दशरथ गिते, अस्मिता दळांजे, हिना निकुरे, क्षिरसागर ठिकरे, सुखदेव दोनाडकर यांचा समावेश होता. यासाठी पोलीस पाटील अर्चना राऊत, श्रीकृष्ण प्रधान व गावकऱ्यांनी सहकार्य केले. वन विभागाच्या मोहिमेच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

Web Title: Older Life Livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.