दीड वर्षात गोदावरी पुलाची दुसऱ्यांदा केली डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:46 AM2018-08-26T00:46:24+5:302018-08-26T00:47:28+5:30

गोदावरील नदीवरील पुलाचे लोकार्पण होऊन आज २० महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अल्पावधीतच पुलाच्या जोडामध्ये भेगा पडल्याने व लोखंडी रॉड बाहेर निघाल्याने दुसऱ्यांदा पुलाची डागडुजी करण्यात आली.

One and a half year, Godavari Bridge's second repair repair was done | दीड वर्षात गोदावरी पुलाची दुसऱ्यांदा केली डागडुजी

दीड वर्षात गोदावरी पुलाची दुसऱ्यांदा केली डागडुजी

Next
ठळक मुद्देवाहनांसाठी ठरला धोकादायक : गाळ्यांच्या जोडावर टाकले काँक्रिट

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गोदावरील नदीवरील पुलाचे लोकार्पण होऊन आज २० महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अल्पावधीतच पुलाच्या जोडामध्ये भेगा पडल्याने व लोखंडी रॉड बाहेर निघाल्याने दुसऱ्यांदा पुलाची डागडुजी करण्यात आली.
गोदावरील पुलावर आठ महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. पुलावर भेगा पडणे, स्लॅबचे पापुद्रे निघणे, जोडावरील सिमेंट काँक्रिट उखडून सळाख बाहेर येणे आदी प्रकार घडल्याने दुसऱ्यांदा २५ आॅगस्टला डागडुजी करण्यात आली. त्यामुळे पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सिरोंचा-कालेश्वरम मार्गावर गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम होऊन २० महिन्यांचा कालावधी उलटला. ३० डिसेंबर २०१६ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची सीमा जोडली गेली. येथून वाहतुकही सुरू झाली. या पुलामुळे आंतरराज्य वाहतूक वाढली. विशेष म्हणजे, रेतीची वाहतूक करणारे अवजड ट्रक याच मार्गाने सदर पुलावरून तेलंगणा व आंध्र प्रदेशात जातात. महाराष्ट्रातील सर्वात लांब पूल म्हणून ओळखल्या जाणाºया या पुलाची लांबी पावणेदोन किमी आहे. पुलाला ३८ गाळे असून २३४ कोटी रूपयांचा खर्च पुलाचे बांधकाम करण्याकरिता आला आहे. पुलाचे गाळे जोडताना लोखंडी रॉडला सिमेंट काँक्रिट लावण्यात आले. परंतु येथील काँक्रिट उखडून रॉड बाहेर पडल्याने वाहनांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा धोका ओळखून डागडुजी करण्यात आली.

Web Title: One and a half year, Godavari Bridge's second repair repair was done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.