एक लाख विद्यार्थ्यांनी केले वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:03 PM2018-10-15T23:03:15+5:302018-10-15T23:03:31+5:30
डीआयईसीपीडीच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हाभरातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. वाचन प्रेरणा दिनाला जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डीआयईसीपीडीच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हाभरातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. वाचन प्रेरणा दिनाला जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
वाचन संस्कृती विकसित व्हावी, या उद्देशाने माजी राष्टÑपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभरातील शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. जिल्हाभरातील सर्वच शाळांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, यासाठी डीआयसीपीडीचे प्राचार्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.शरदचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला मोठ्या अक्षरातील १० पानांचा एक संच देऊन त्याचे वाचन करण्यात आले. यालाच पुस्तक असे समजण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सुद्धा वाचन केले. जिल्हाभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.