चामोर्शी बाजार समितीवर गण्यारपवार गटाचा एकतर्फी विजय

By admin | Published: September 16, 2015 01:45 AM2015-09-16T01:45:51+5:302015-09-16T01:47:31+5:30

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार ...

The one-sided win of the Group on the Chamorshi Market Committee | चामोर्शी बाजार समितीवर गण्यारपवार गटाचा एकतर्फी विजय

चामोर्शी बाजार समितीवर गण्यारपवार गटाचा एकतर्फी विजय

Next

सर्व जागा जिंकल्या : भाजपसह राष्ट्रवादींच्या हलगेकरांना जोरदार हादरा
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवून भाजप समर्थीत पॅनलचा धुव्वा उडविला. भाजप पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
सेवा सहकारी मतदार संघातून अतुल गण्यारपवार गटाचे सात सदस्य विजय झालेत. यामध्ये अरूण बंडावार २८१ मते, अतुल गण्यारपवार ३००, जानकीराम कुसनाके २६३, परमानंद मलिक २७५, सुधाकर निखाडे २८८, गोसाई सातपुते २८१, शंकरराव वंगावार २५६ मते घेऊन विजयी झाले. यांनी भाजपा समर्थीत गटाचे बाबुराव बकाले २१३, धर्मेंद्र दुबे २१७, किरण कोवासे २०५, तुकाराम तोरे २०२, शिशीर पोतदार १९५, कैलाश सातपुते २०९, फकीरा ठेंगणे यांना १८८ मते मिळून त्यांचा पराभव झाला. याच गटात अपक्ष असलेले यशवंत देवतळे यांना ७, देवराव सिडाम यांना चार मते मिळाली.
महिला गटातून अतुल गण्यारपवार गटाच्या बैनाबाई मडावी, कौशल्या पोरटे यांनी भाजप समर्थीत गटाच्या बेबी भोयर, भानूमती राय यांचा पराभव केला. बैनाबाई मडावी यांना २७८, कौशल्या पोरटे यांना २८३, बेबी भोयर यांना २४४, भानूमती राय यांना २११ मते मिळाली. इतर मागास वर्गीय गटातून अतुल गण्यारपवार गटाचे विनायक आभारे २७६ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भाजप समर्थीत गटाचे सुधीर शिवणकर यांचा पराभव केला. शिवणकर यांना २५० मते मिळाली. भटक्या जमाती विमुक्त जाती गटात अतुल गण्यारपवार गटाचे गणपती भेंडारे २७८ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भाजप समर्थीत गटाचे यशवंत कलसार यांचा पराभव केला. कलसार यांना २४४ तर अनिल एलावार यांना सहा मते मिळाली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून गण्यारपवार गटाचे सतिश रॉय ३८५ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजप गटाचे उमेश कुकडे यांचा पराभव केला. कुकडे यांना २८४ मते मिळाली. तर या गटात अपक्ष किशोर पोरटे यांना आठ मते मिळाली. हमाल, मापारी, तोलारी गटातून अपक्ष अनिल नैताम १०७ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी विलास कुकडे यांचा पराभव केला. कुकडे यांना ९६ मते मिळाली. या गटात संदीप राऊत यांना तीन मतांवर समाधान मानावे लागले. यापूर्वीच अमोल गण्यारपवार, शामराव लटारे, चंद्रकांत दोषी, बाजीराव गावडे हे अविरोध निवडून आले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रविण निनावे यांनी काम पाहिले. सहा टेबलावर मतमोजणी प्रक्रिया चालली. यावेळी पोलीस निरिक्षक किरण अवचार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलला काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम यांनी सहकार्य केले होते. या पॅनलच्या विरोधात भाजपने निवडणूक रिंगणात उडी घेतली. भाजपच्या पॅनलची धूरा खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतूराज हलगेकर यांनी सांभाळली होती.
या पॅनलला गण्यारपवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने चारही मुंड्या चित केले. एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. दारूण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही प्रचंड अस्वस्थता आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The one-sided win of the Group on the Chamorshi Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.