आरोग्य मेळाव्यात एक हजार रूग्णांची तपासणी
By admin | Published: March 24, 2017 01:07 AM2017-03-24T01:07:49+5:302017-03-24T01:07:49+5:30
उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे गुरूवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान व उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उपजिल्हा रूग्णालयाच्या पुढाकारातून शिबिर : व्यसन सोडण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
कुरखेडा : उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे गुरूवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान व उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान दिवसभरात एक हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, नगर पंचायत आरोग्य सभापती आशा तुलावी, बांधकाम सभापती संतोष भट्टड, पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य धरमदास उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, मनोज सिडाम, पं.स. सदस्य श्रीराम दुगा, आरमोरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले, परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक मनिष नंदनवार, डॉ. धुर्वा, डॉ. सावसागडे यांच्यासह दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू उपस्थित होती. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांनी समाजात व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यसनामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दात व मुख रोगांमध्ये वाढ झाली आहे. व्यसनाधिनतेला विरोध करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपचंद सोयाम, संचालन डॉ. जनबंधू व श्यामला कुंबळे तर आभार राहूल भुरडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)