सिरोंचात लागणार एक हजार रोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:12 AM2018-03-08T01:12:52+5:302018-03-08T01:12:52+5:30
सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १७ प्रभागात मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
ऑनलाईन लोकमत
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १७ प्रभागात मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. भर उन्हाळ्यात एक हजार रोपटे लावण्यासाठी खड्डे खोदकामास प्रारंभ झाला आहे. १८ लाख ५० हजार रूपयातून वृक्ष लागवडीच्या माध्यमातून सिरोंचा शहर हिरवेगार करण्याचा मानस नगर पंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नवीन प्रणालीनुसार सिरोंचा शहरात वृक्ष लागवडीचे काम होणार आहे. या कामाचे कंत्राट नागपूर येथील मे. रेनबो ग्रिनर्स यांना देण्यात आले आहे. खड्डे खोदणे, ट्रीगार्डसोबत रोपटे लावणे आदी काम करण्यात येणार आहे. सदर कामाबाबत नगर पंचायतीचा ठराव यापूर्वीच पारित करण्यात आला. त्यानंतर न.पं. प्रशासनाने या कामाची आॅनलाईन निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता घेऊन नागपूरच्या कंत्राटदाराच्या नावे वर्क आदेश देण्यात आले. सदर कंत्राटदाराने आपल्या मजुरांकरवी आता सिरोंचा शहरात खड्डे खोदण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. नवीन प्रणालीनुसार वृक्ष लागवड होणार असल्याने लावलेल्या वृक्षांना १५ दिवसातून एकदा पाणी दिले तरी भागणार आहे.
नव्या प्रणालीअंतर्गत सिरोंचा नगर पंचायतीच्या क्षेत्रात वृक्ष लागवड होणार असल्याने ९० टक्के वृक्ष जगणार आहेत. नियमानुसार ठराव पारित करून आॅनलाईन निविदा प्रक्रिया राबवून वृक्ष लागवड व संगोपणाचे महत्त्वपूर्ण कार्य नगर पंचायत प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. कंत्राटदारामार्फत होणाºया या कामावर आपले पूर्ण लक्ष आहे.
- भारत नंदनवार, मुख्याधिकारी, नगर पंचायत, सिरोंचा