ऑनलाइन एज्युकेशनमुळे जिल्ह्यात पालकांचा वाढला खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:12+5:302021-07-05T04:23:12+5:30
गडचिराेली : यंदाचे शैैक्षणिक सत्र २८ जून २०२१ पासून सुरू झाले असले तरी काेराेना संसर्ग व डेल्टाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी ...
गडचिराेली : यंदाचे शैैक्षणिक सत्र २८ जून २०२१ पासून सुरू झाले असले तरी काेराेना संसर्ग व डेल्टाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सलग दुसऱ्याही दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन एज्युकेशनवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांचा साधारणत: ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणाचा फारसा फायदा हाेत नसून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मंदावत असल्याचे अनेक पालकांकडून सांगितले जात आहे.
काेविड-१९ च्या प्रकाेपामुळे गडचिराेली जिल्ह्यातील सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियाेजन काेसळले आहे. एकीकडे आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, असे त्यांना वाटते तर दुसरीकडे आर्थिक बाबतीत ताे हतबल आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे संगणक किंवा स्मार्ट फाेन, टॅबलेेट अत्यावश्यक आहे. गाेरगरीब पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. कसेबसे करून माेबाइल घेतला तरी दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे. शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्यासुद्धा घ्याव्या लागत असल्याने ऑफलाइन शिक्षणापेक्षा ऑनलाइन शिक्षणाने पालकांचे कंबरडे माेडल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स...
महिन्याकाठी इंटरनेसाठी २५० रुपये
- काेराेना संसर्गामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. यासाठी स्मार्ट फाेन, टॅबलेट किंवा संगणकावर इंटरनेट चालू ठेवावे लागते.
- महिन्याकाठी पालकांना इंटरनेटवर किमान २५० रुपये खर्च करावे लागत आहे. त्यातही ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने त्याचा फायदा हाेत नसल्याचे दिसून येते.
- आधिच काेराेना संकटामुळे जिल्ह्यात अनेकांचे छाेटे-माेठे व्यवसाय डबघाईस आले. मजूर व कामगारांचा राेजगार हिरावला गेला. खासगी नाेकरी करणाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली नाही. दुसरीकडे खर्च वाढला.
काेट...
यंदाही काेराेनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मुलाचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी स्मार्ट फाेनची व्यवस्था करावी लागली. त्यात माेबाइल रिचार्जची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे मासिक खर्चात वाढ झाली आहे.
- संगीता सरपे, पालक
..................
काेराेनामुळे ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यात आमच्या मुलामुलींचा ऑनलाइन क्लास एकाचवेळी असताे. त्यामुळे दाेन स्वतंत्र स्मार्ट फाेन घ्यावे लागले. दर महिन्याला त्यांच्या माेबाइल रिचार्जसाठी ५०० रुपये खर्च करावे लागतात.
- सारिका बाेदलकर, पालक
.......................
मुलांचे हाेतेय नुकसान
शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणात बरीच तफावत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे स्नेहसंमेलन, खेळ व सहलीवर निर्बंध आले असून मुले, मुली एकलकाेंडी हाेत आहेत. मानसिक विकासासाठी माेकळे वातावरण असणे अपेक्षित आहे. माेबाइलवर अभ्यास केला जात असल्यामुळे मुलांचे मन विचलित हाेऊ शकते. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण हाेते.
- मनीष मेश्राम, मानसिक राेगतज्ज्ञ, गडचिराेली