शेतमालाची होणार आॅनलाईन खरेदी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:23 AM2017-08-13T00:23:07+5:302017-08-13T00:24:06+5:30
शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्टÑातील ३० कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. अहेरी उपविभागातील शेतकºयांना आता आपल्या शेतमालाची खरेदी विक्री आॅनलाईन पद्धतीने करता येणार असून ई-लिलावाचा लाभ शेतकºयांना होणार आहे.
बाहेरील बाजार सुरू असलेल्या शेतमालाच्या भावाची माहिती स्थानिकस्तरावर मिळावी, तसेच शेतकºयांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा, खरेदी-विक्रीत पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र शासनाने ई-नाम योजना सुरू केली आहे. आॅनलाईन खरेदी-विक्रीची सदर योजना सुरुवातीला काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा प्रकारची आॅनलाईन खरेदी-विक्री प्रक्रिया संपूर्ण महाराष्टÑात व सर्व ठिकाणी सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सदर आॅनलाईन प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या प्रक्रियेद्वारे सोयाबीन, धान, तूर, मूग, उडीद, बरबटी, कापूस, ज्वारी, मक्का आदीसह इतर शेतमालाची आॅनलाईन खरेदी करता येणार आहे. शनिवारी अहेरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात याबाबत बैठक पार पडली. यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी यांना आॅनलाईन पद्धतीने शेतमालाची विक्री व बाहेरील बाजारात शेतमालाची बोली कशा पद्धतीने लावावी तसेच खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करावे, यासह इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती नेमलेल्या कंपनीमार्फत देण्यात आली.
ई-नाम योजनेअंतर्गत अहेरी उपविभागातील शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री योग्यदराने करू शकतील, अशी शक्यता आहे.
ई-नाम योजनेचा शुभारंभ
अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ई-नाम योजनेअंतर्गत आॅनलाईन खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक प्रशांत पत्तीवार, मुथन्ना पेंदाम, विनोद अक्कनपल्लीवार, व्यापारी श्रीकांत मद्दीवार, सुधाकर बिरेल्लीवार, बाजार समितीचे कर्मचारी रमेश सापेलवार, महेश गुप्ता, हेमंत देशमुख, लक्ष्मणरेड्डी चिर्लावार, महेश गद्देवार, जीवनदास तावाउे, सुरेश करमे आदी उपस्थित होते.