ऑनलाईन प्रक्रियेमुळे जिल्ह्यात वाहनधारकांना मिळतोय दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:49+5:302021-06-10T04:24:49+5:30

गडचिराेली : काेराेना संसर्गामुळे अनेकांचे वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण थांबले हाेते. दरम्यान, गडचिराेली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मुदत वाढवून ही ...

The online process is a relief to the vehicle owners in the district | ऑनलाईन प्रक्रियेमुळे जिल्ह्यात वाहनधारकांना मिळतोय दिलासा

ऑनलाईन प्रक्रियेमुळे जिल्ह्यात वाहनधारकांना मिळतोय दिलासा

Next

गडचिराेली : काेराेना संसर्गामुळे अनेकांचे वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण थांबले हाेते. दरम्यान, गडचिराेली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मुदत वाढवून ही प्रक्रिया ऑनलाईन केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडाे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग महामारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालयातील नागरिकांची कामे खाेळंबली हाेती. काेराेना संसर्गामुळे अनेक वाहनचालकांचे परवाना नूतनीकरणाचे काम प्रलंबित हाेते. वाहन परवान्याचे नूतनीकरण झाले नाही, तर नवीन परवाना तर काढावे लागणार का, असा प्रश्न अनेक वाहनचालकांसमाेर निर्माण झाला हाेता. दरम्यान, परवाना नूतनीकरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात आली. शिवाय परवानाबाबतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली.

बाॅक्स...

११ वाहनांची नाेंदणी

साेमवारपासून लाॅकडाऊन हटविण्यात आले. अनलाॅक झाल्यापासून गेल्या दाेन दिवसांत गडचिराेली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन ११ वाहनांची नाेंदणी झाली. आता खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत वाहन नाेंदणीचे प्रमाण वाढणार आहे.

................

८० परवान्यांचा काेटा

शिकाऊ तसेच कायमस्वरूपी परवान्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एका दिवसाला ८० परवान्यांचा काेटा आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहन परवान्यांचा समावेश आहे. परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात असून, आवश्यक दस्तावेज संकेतस्थळावर अपलाेड करावे लागते.

...............

एजंटचा राेजगार बुडाला

काेराेना संसर्ग समस्येमुळे आरटीओ कार्यालयातील वाहनधारकांचे वाहन ट्रान्सफरचे काम बंद आहे. शिवाय ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने एजंटचे काम कमी झाले. आता अनलाॅक झाल्यानंतर वाहन ट्रान्सफरचे काम सुरू झाल्यावर एजंटला काम मिळण्याची शक्यता आहे. काेराेना काळात एजंटचा राेजगार बुडाला हाेता.

काेट....

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून, तसेच वाहनचालकांची अडवणूक हाेऊ नये, याकरिता नवीन परवाना व नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. केवळ ट्रान्सपाेर्ट वाहनधारकांना प्रत्यक्ष बाेलाविले जात आहे.

- पी. व्ही. सावंत, माेटार वाहन निरीक्षक, गडचिराेली

Web Title: The online process is a relief to the vehicle owners in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.