मतदार यादीत आॅनलाईन नोंदणीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:42 AM2019-01-26T00:42:03+5:302019-01-26T00:42:27+5:30
सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
नियोजन भवनातील नवीन सभागृहात मतदार दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करणे आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू, अशा आशयाची शपथ यावेळी कर्मचाºयांना देण्यात आली.
लोकशाहीच्या उभारणीत मतदारांनी आपले योगदान द्यावे, आपल्या शेजारी असलेल्या नागरिक व युवकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. मतदारांमध्ये जनगृती व्हावी आणि मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदार दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा नववा मतदार दिन जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला.
संचालन नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी केले.
दौड स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती
दौड स्पर्धेत गडचिरोली येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून सेमाना आणि परत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दौडमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या युवक युवतींना रोख, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये रितीक संजय पंचबुध्दे, ओमसाईराम मधुकर कुमरे, हेमंत संजय आथिलकर, कुमारी प्रतिक्षा रमेश करंगाम, सुशिला जंतुराम चनाप, दुर्गेश्वरी किसन किरसान यांचा समावेश होता. दौडमध्ये अधिकारी व कर्मचाºयांनीही सहभाग घेतला. यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, सीईओ डॉ. विजय राठोड, मनिष कुमार, भुवनेश पाटील, रोहन गुगे यांचा समावेश आहे.