आॅनलाईन शिष्यवृत्तीने वाढविली डोकेदुखी

By Admin | Published: January 6, 2016 01:56 AM2016-01-06T01:56:44+5:302016-01-06T01:56:44+5:30

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मार्फतीने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती दिली जाते.

Online scholarship increases headache | आॅनलाईन शिष्यवृत्तीने वाढविली डोकेदुखी

आॅनलाईन शिष्यवृत्तीने वाढविली डोकेदुखी

googlenewsNext

शिक्षक त्रस्त : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
गडचिरोली : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मार्फतीने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शासनाने आॅनलाईन केले आहेत. त्यामुळे शिक्षक वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव यापूर्वी आॅफलाईन पद्धतीने सादर केले जात होते. या प्रस्तावामध्ये विद्यार्थ्याची इत्यंभूत माहिती दिली जात होती. त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्यांचे दाखले, प्रमाणपत्र जोडून सदर प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर केला जात होता. मात्र यावर्षीपासून शासनाने या शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने मागविण्यास सुरूवात केली आहे. मात्र ही पद्धतीने अत्यंत किचकट आहे. आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर त्याच्या प्रिंटआऊट काढाव्या लागतात. सदर प्रिंटआऊट उमेदवारांच्या पासपोर्ट फोटोसह पालक व मुख्याध्यापकांच्या सहीनिशी गोषवारा तयार करावा लागतो. त्यावरही मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्या सह्या घ्यावा लागतात. त्यानंतर सदर अर्ज प्रकल्प कार्यालयाला सादर करता येतो. ही सर्व प्रक्रिया करताना मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकाचा बराचसा वेळ वाया जात आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकवर्ग त्रस्त झाले असल्याचा आरोप कुलभट्टी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णकुमार निकोडे यांनी केला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Online scholarship increases headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.