केवळ १७.१४% पाणीकर वसुली
By admin | Published: January 4, 2016 03:55 AM2016-01-04T03:55:23+5:302016-01-04T03:55:23+5:30
जिल्ह्यातील बाराही पंचायत समिती अंतर्गत एकूण ४५६ ग्रामपंचायतींची १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ
आठ महिन्यांत : ग्रामपंचायतींची उदासीनता चव्हाट्यावर
गडचिरोली : जिल्ह्यातील बाराही पंचायत समिती अंतर्गत एकूण ४५६ ग्रामपंचायतींची १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत केवळ १७.१४ टक्के पाणी कर वसुली झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी कर वसुलीत साऱ्याच ग्रामपंचायती प्रचंड माघारल्याचे दिसून येत आहे.
१२ ही पंचायत समितीतील एकूण ४५६ ग्रामपंचायतीची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून ३ कोटी ४९ लाख ३७ हजार ९४१ रूपये पाणीपट्टी कराची मागणी होती. यापैकी जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून ३० नोव्हेंबरपर्यंत केवळ ५९ लाख ८८ हजार ९०२ रूपये पाणी कर वसुली झाली असून याची टक्केवारी १७.१४ आहे.
गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतीची मागील थकबाकीची ९ लाख २४ हजार ३८५ रूपये पाणी कराची मागणी होती. मात्र यापैकी ग्रामपंचायतीने एकाही रूपयाची पाणी कर वसुली नागरिकांकडून केली नाही. त्यामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायती पाणी कर वसुलीत प्रचंड पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
आरमोरी तालुक्यात जुनी थकबाकी व चालू वर्षाची मिळून ४३ लाख २५ हजार १०७ रूपयांची मागणी होती. ग्रामपंचायतींनी जुनी व चालू वर्षाची मिळून एकूण ९ लाख ९४ हजार ९७५ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी २३ आहे. देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ३४ लाख ९५ हजार ९२९ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी एकूण ४७ लाख ८ हजार ७०४ रूपयांची वसुली झाली असून याची टक्केवारी १३.६९ आहे. कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ३४ लाख १० हजार ७२९ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी ३० नोव्हेंबरपर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५ लाख १२ हजार ६१९ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी १५.०३ आहे. कोरची तालुक्यातील ग्रामपंचायतीची मागील थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण ७ लाख २८ हजार ६३६ रूपयांची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी एकूण १ लाख २७ हजार २७० रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी १७.४७ आहे.
धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीची जुनी थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १९ लाख ७८ हजार ४६९ रूपयांची कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी एकूण ४ लाख १५ हजार ९९२ रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी २१.३ आहे. चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीची एकूण ८२ लाख ३७ हजार ६८ रूपयांची पाणी कराची मागणी होती. यापैकी ग्रामपंचायतींनी १२ लाख ३५ हजार ५६० रूपयांची कर वसुली केली असून याची टक्केवारी १५ आहे. मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायती एकूण १५ लाख ८७ हजार रूपये कराची मागणी होती. यापैकी ५ लाख ४४ हजार ७०० रूपये कर वसुली झाली असून याची टक्केवारी ३४.३२ आहे. एटापल्ली तालुक्यातील १३ लाख ६८ हजार ९४५ रूपयांच्या मागणीपैकी ४ लाख २४ हजार ३७२ रूपयांची कर वसुली झाली असून याची टक्केवारी ३१ आहे. सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आठ महिन्यांत एकूण ९ लाख ४८ हजार ८९६ रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी १८.८५ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चालू वर्षाची गृहकर वसुली ठप्प
४राज्याच्या ग्राम विकास विभागाने २०१५-१६ वर्षापासून ग्रामपंचायतीच्या कर आकारणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भाचे २१ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा .परिषदेला पत्रही प्राप्त झाले. मात्र ग्राम विकास विभागाकडून ग्रामपंचायतीच्या गृहकराचे नवीन दर निश्चित करण्यात आले नसल्याने ग्रामपंचायतीची चालू वर्षाची गृहकर वसुली ठप्प आहे. काही ग्रामपंचायती जुनी थकीत गृहकराची वसुली करीत असल्याचे दिसून येते.बहूतांश ग्रामपंचायतींनी पाणी करवसुलीला खो दिला आहे.
अहेरी, भामरागड तालुके कर वसुलीत पिछाडीवर
४अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकूण २९ लाख ६६ हजार ९६२ रूपये मागणीपैकी केवळ २ लाख १६ हजार ९९४ रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी ७.३१ आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पाणी कर वसुलीत अहेरी तालुका सर्वात पिछाडीवर असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल भामरागड तालुक्यातील ग्रा.पं.नी केवळ ८८ हजार ८२० रूपयांची पाणी कर वसुली केली असून याची टक्केवारी १०.०८ आहे. भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायती पाणी कर वसुलीत माघारल्या आहेत.