केवळ २२ घरकूल पूर्ण

By Admin | Published: June 8, 2016 01:11 AM2016-06-08T01:11:48+5:302016-06-08T01:11:48+5:30

इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात एकूण ४ हजार ८६८

Only 22 homework complete | केवळ २२ घरकूल पूर्ण

केवळ २२ घरकूल पूर्ण

googlenewsNext

गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ २२ घरकूल पूर्ण झाले आहेत. तर तब्बल ४ हजार ८४६ घरकूल अपूर्णावस्थेत आहेत.
सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी ४ हजारावर घरकूल मंजूर केले जातात. मात्र आर्थिक वर्ष संपल्यानंतरही घरकुलांचे काम १०० टक्के पूर्ण होत नाही, असा अनुभव दरवर्षी येतो. सन २०१५-१६ या वर्षात ३१ मार्च पूर्वी एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले.
यामध्ये अहेरी तालुक्यात १ हजार ९३, आरमोरी तालुक्यात २११, भामरागड १५१, चामोर्शी ७७८, देसाईगंज ७६, धानोरा ४२३, एटापल्ली १५२, गडचिरोली ७०३, कोरची २७३, कुरखेडा ४४०, मुलचेरा २९० व सिरोंचा तालुक्यातील २७८ घरकुलांचा समावेश आहे. जिल्ह्यात मार्च अखेरपासून घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ हजार २८३ घरकुलांचे काम सुरू झाले आहेत. यापैकी ५८५ घरकूल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले आहे. तर ७०९ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले.
सद्य:स्थितीत पूर्ण झालेल्या २२ घरकुलांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २०, धानोरा १ व मुलचेरा तालुक्यातील एका घरकुलाचा समावेश आहे. अद्यापही ४ हजार ८४६ घरकूल अपूर्णस्थितीत आहेत. ७०९ घरकुलांचे काम स्लॅबस्तरापर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये अहेरी तालुक्यातील तीन, आरमोरी तालुक्यातील ७६, भामरागड तालुक्यातील १३, चामोर्शी तालुक्यातील ४६, देसाईगंज तालुक्यातील ३०, धानोरा ६२, गडचिरोली ३५६, कोरची ६१, कुरखेडा ६० व सिरोंचा तालुक्यातील दोन घरकुलांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

५८५ घरकुलांना प्रारंभ नाही
४जिल्हाभरात एकूण ४ हजार ८६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ४ हजार २८३ घरकुलांचे काम हाती घेण्यात आले. अद्यापही ५८५ घरकुलांच्या बांधकामांना प्रारंभच झाला नसल्याची माहिती डीआरडीएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या ५८५ घरकुलांमध्ये अहेरी उपविभागाच्या पाच तालुक्यातील घरकुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दुर्गम भागातील घरकुलाचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. मात्र याकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

१५ जून नंतर घरकुलांच्या कामाला लागणार ब्रेक
४पावसाळ्याला सुरूवात झाली असून गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी व रविवारी तसेच काही भागात सोमवारी वादळासह जोरदार पाऊस बरसला. यात स्लॅब स्तरावर पोहोचलेल्या घरकुलांचे नुकसान झाले. स्लॅब टाकून बाहेरील काम पूर्ण झालेल्या घरकुलाचे आतील काम पावसाळ्यातही करणे शक्य होणार आहे. मात्र जोता स्तरापर्यंत काम पोहोचलेल्या घरकुलाचे काम १५ जूननंतर पावसामुळे पूर्णत: बंद होणार आहे. या वर्षातही १०० टक्के घरकुलाचे काम पूर्ण होणे शक्य नाही.

Web Title: Only 22 homework complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.