केवळ ६१ टक्के वीज ग्राहकांनी भरले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:34+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले.

Only 61% of electricity consumers paid their bills | केवळ ६१ टक्के वीज ग्राहकांनी भरले बिल

केवळ ६१ टक्के वीज ग्राहकांनी भरले बिल

Next
ठळक मुद्देमहावितरणचे वाढले टेन्शन : लॉकडाऊनमधील वीज वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीपासून थकीत बिलाची रक्कम वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या चार महिन्यांमधील ३९ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरलेच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज बिल थकल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते. विजेचा वापर सरासरीपेक्षा अधिक झाला. बिल मात्र प्रत्यक्षात कमी पाठविण्यात आले. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात रिडींग घेणे सुरू झाले. त्यावेळी उर्वरित वीज बिल पाठविण्यात आले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याने अनेक ग्राहकांना बिल भरणे शक्य झाले नाही. सप्टेंबर महिना उलटूनही काही ग्राहकांनी अजूनपर्यंत वीज बिलाचा भरणा केला नाही.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हाभरातील ग्राहकांनी १०३.६८ कोटी रुपयांचा वीज वापर केला. पण प्रत्यक्षात ६२ कोटी ७५ लाख एवढीच वसुली झाली आहे. एकूण वीज बिलाच्या केवळ ६०.५२ टक्के एवढीच वसुली झाल्याने महावितरणपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे. महावितरणला कर्मचारी, वीज खरेदी, वीज निर्मिती, शासकीय कार्यालयाचा खर्च आदींवर नियमित खर्च करावा लागतो. अगोदरच महावितरणाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात वीज बिल थकल्याने आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरण आता वीज बिल वसुलीला गती देण्याची शक्यता आहे.

वीज माफीच्या चर्चेचा परिणाम
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल काही प्रमाणात माफ केले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाच्या काही मंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात आढावा घेतला असता, वीज बिल माफ करणे शक्य नाही, असा शेरा वित्त विभागाने मारला. त्यानंतर वीज बिल माफ होण्याच्या चर्चा बंद झाल्या. मात्र या चर्चांमुळे क्षमता असलेल्या नागरिकांनीही वीज बिलाचा भरणा केला नाही. आता. पाच महिन्यांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.

ग्राहकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पैशातूनच महावितरणचा सर्व खर्च भागविला जाते. चांगली सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलाचा नियमित भरणा करावा. वीज पुरवठा खंडीत करण्याची पाळी महावितरणवर येऊ देऊ नये.
- विजय मेश्राम,
अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Only 61% of electricity consumers paid their bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज