शिक्षणाच्या जाेरावरच युवक मिळवू शकतात विविध क्षेत्रात माेठे पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:00 AM2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:44+5:30

गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत उपविभाग कुरखेडा व पोलीस स्टेशन कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने नवेझरी येथे ११ सप्टेंबर राेजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. नवेझरी येथील सरपंच विजय हिडामी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

Only on the basis of education can the youth get higher posts in various fields | शिक्षणाच्या जाेरावरच युवक मिळवू शकतात विविध क्षेत्रात माेठे पद

शिक्षणाच्या जाेरावरच युवक मिळवू शकतात विविध क्षेत्रात माेठे पद

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरची : आपण लहान गावातील रहिवासी असलाे तरी शिक्षणामुळे आपण मोठे पद मिळवू शकतो, हा अधिकार आपणाला भारतीय संविधानातून मिळालेला आहे. त्यामुळे गावातील युवक भरपूर शिक्षण घेऊन आयपीएससारखे पद मिळवू शकतात, असे प्रतिपादन गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले.
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत उपविभाग कुरखेडा व पोलीस स्टेशन कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने नवेझरी येथे ११ सप्टेंबर राेजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. नवेझरी येथील सरपंच विजय हिडामी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, नागपूर विशेष कृती दलाचे पोलीस अधीक्षक निल अब्राहीम, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, कुरखेडा पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, कोरचीचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले, तहसीलदार सी. आर. भंडारी, नवेझरीचे ग्रामसेवक योगाजी बन्सोड, माजी पोलीस पाटील तुळशीराम हिडामी, प्रतापसिंह गजभिये, निळा किलनाके आदी  उपस्थित होते. 
गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत आदिवासी रेला नृत्य सादर करून वाजतगाजत, नाचत केले. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. या मेळाव्यात हजारोंच्या वर नागरिक उपस्थित होते. कोरची तालुक्यात पोलीस विभागाकडून  आतापर्यंतच्या झालेल्या जनजागरण मेळाव्यापैकी हा पहिला मेळावा असेल की अतिदुर्गम, नक्षलग्रस्त नवेझरीसारख्या गावात वरिष्ठ पोलीस अधिकारी  हेलिकॉप्टरने येऊन मेळाव्याला उपस्थित झाले हाेते. यशस्वीतेसाठी गावातील व परिसरातील नागरिक व पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

४९ गावांतील हजारो लाभार्थींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
सदर मेळाव्यात गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते ४९ गावांतील हजारो लाभार्थींना झेरॉक्स मशीन, एलईडी टीव्ही, भांडे, सायकल, शिलाई मशीन, अशा विविध जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यामध्ये रांगोळी, हॉलीबॉल, कबड्डी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच  मोफत औषधोपचार व आरोग्य शिबिराचे स्टॉलही लावण्यात आले होते. यावेळी सरपंच, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी व असंख्य नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Only on the basis of education can the youth get higher posts in various fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस