...अन् खासदारांनीच केले धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:33+5:30
भारत सरकारच्या वतीने देशातील सर्व राज्यांमध्ये गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानांमार्फत मोफत अन्नधान्य दिले जात आहे. मात्र भाजपची सत्ता नसलेली काही राज्ये मोफत अन्नधान्य राज्य सरकारद्वारा दिल्या जात असल्याचे खोटे सांगत आहेत. सदर योजना केंद्र सरकारने सुरू केली असून कोविडमुळे रोजगार हिरावलेल्या गरीब, कामगार नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरणाच्या स्वरुपात अंमलबजावणी केली जात असल्याचे खासदार नेते यांनी सांगितले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारतर्फे देशातील ८० कोटी गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे. याचे वितरण याेग्य प्रकारे हाेत आहे की नाही, याबाबतची माहिती घेण्यासाठी खा. अशाेक नेते यांनी नुकतीच गडचिरोली येथील एका स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन लाभार्थ्यांची विचारपूस करीत अन्नधान्याचे वाटप केले.
याप्रसंगी भाजप अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. भारत खटी, विलास भांडेकर, पांडूरंग भांडेकर उपस्थित होते. यावेळी अन्नधान्य लाभार्थांना पत्रकेही वितरित करण्यात आली.