भामरागड रुग्णालयात एकच डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:24 AM2017-10-08T01:24:44+5:302017-10-08T01:24:54+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर स्थायी उपलब्ध नाही.

Only one doctor at Bhamragad Hospital | भामरागड रुग्णालयात एकच डॉक्टर

भामरागड रुग्णालयात एकच डॉक्टर

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णांचे हाल : आरोग्य कर्मचाºयांचीही पदे रिक्त; सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : येथील ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर स्थायी उपलब्ध नाही. मन्नेराजाराम येथील डॉ. भूषण चौधरी यांच्याकडे रुग्णालयाचा प्रभार सोपविला आहे. ते एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची नेहमी गर्दी राहत असल्याने डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत.
गडचिरोली मुख्यालयापासून २०० किमी अंतरावर असलेल्या भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. भामरागड तालुका आदिवासीबहुल असून येथील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने येथील रुग्ण ग्रामीण रुग्णालयातच उपचार घेतात. दुर्गम भागातून दरदिवशी बाह्यरुग्ण विभागात २०० रुग्ण उपचारासाठी येतात. तर २० ते २५ रुग्ण भरती राहतात. एवढ्या सर्व रुग्णांचा भार एकट्या डॉक्टरला सांभाळावा लागत आहे. त्यामुळे त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत असून रुग्णांचे सुद्धा हाल होत आहेत. येथील डॉक्टर जामी यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय बेभरशोचे झाले आहे. येथील डॉक्टर शृंगारे यांची एटापल्ली येथे व डॉ. वानखेडे यांना आष्टी येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. डॉक्टरसह रुग्णालयातील इतरही आरोग्य कर्मचाºयांची २६ पैकी १२ पदे रिक्त आहेत.
रुग्णालयातील रिक्तपदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, सहायक अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी, पाच अधिपरिचारिकेची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, क्ष-किरण तंत्रज्ञ, औषधी निर्माता, शिपाई, तीन कक्ष सेवक, सफाई कामगार यांचे सुद्धा पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत या रुग्णालयात डॉ. भूषण चौधरी हे रात्रंदिवस सेवा देत असल्याने त्यांना सहायक अधीक्षक पदावर नेमावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. रिक्तपदे भरावी, अशी मागणी आहे.

Web Title: Only one doctor at Bhamragad Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.