जिवावर उदार हाेऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ३५० रुपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:35+5:302021-05-22T04:33:35+5:30

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांचा आकडा चार हजारापर्यंत गेला हाेता. एवढ्या रुग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य यंत्रणा ...

Only Rs. 350 for those who treat the dead with generosity | जिवावर उदार हाेऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ३५० रुपये दाम

जिवावर उदार हाेऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ३५० रुपये दाम

Next

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रुग्णांचा आकडा चार हजारापर्यंत गेला हाेता. एवढ्या रुग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्रयस्त संस्थेमार्फत नेमणूक करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जवळपास १०० कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले आहेत. काेराेना हा अतिशय संसर्गजन्य राेग आहे. लागण झालेल्या अनेकांचा जीव या राेगामुळे गेला आहे. त्यामुळे समाजमनावर या राेगाविषयी एक प्रकारची भीती आहे. या रुग्णांना सेवा देण्याचे काम हे कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. मात्र दिवसाला केवळ ३५० रुपये एवढेच मानधन दिले जाते.

बाॅक्स

पाेट भरेल एवढे पैसे द्या

-काेराेनाची भीती साऱ्या जगाने घेतली आहे. काेराेनाचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह येताच सख्खे नातेवाईकही परक्याप्रमाणे वागू लागतात. अशा स्थितीत त्यांना सेवा देण्याचे काम आमच्याकडून हाेते. अतिशय जाेखमीचे काम असल्याने त्यासाठी पाेट भरेल एवढे तरी मानधन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ३५० रुपयेच हातात दिले जातात.

- कंत्राटदाराने १२ हजार रुपये मानधन देण्याचा करार केला आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ९ ते १० हजार रुपये एवढेच मानधन दिले जाते.

बाॅक्स

काय काम करावे लागते

काेराेना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव प्लॅस्टिकमध्ये सील बंद करणे. हे शव शववाहिकेपर्यंत पाेहाेचविणे. आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे. एखादा रुग्ण ऑक्सिजनवर असेल तर त्याला मदत करणे. आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

काेट

काेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला सेवा देण्याचे धाेकादायक काम आमच्याकडून करवून घेतले जाते. त्यासाठी किमान २० हजार रुपये मासिक मानधन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र १२ हजार रुपये मानधन रुपये देण्याचा करार केला आहे. प्रत्यक्षात केवळ ९ ते १० हजार रुपये एवढेच मानधन दिले जात आहे.

- कंत्राटी कर्मचारी

काेराेनाच्या काळात राेजगार नसल्याने नाईलाजास्तव हा राेजगार स्वीकारावा लागला आहे. आठ तास राबवून घेतले जाते. विशेष म्हणजे केेवळ तीनच महिन्यांसाठी राेजगार आहे.

-कंत्राटी कर्मचारी

कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची संख्या-९७

दिवसाला मिळणारी मजुरी- ३५०

कामाचे

कंत्राट-३ महिने

Web Title: Only Rs. 350 for those who treat the dead with generosity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.