मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:58+5:302021-03-05T04:35:58+5:30
आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीघाटावर कित्येक वर्षापासून अंत्यसंस्कार पार पाडले जातात. अंत्ययात्रेसाठी शेकडो नागरिक स्मशानघाटावर जातात. परंतु वैनगंगा ...
आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीघाटावर कित्येक वर्षापासून अंत्यसंस्कार पार पाडले जातात. अंत्ययात्रेसाठी शेकडो नागरिक स्मशानघाटावर जातात. परंतु वैनगंगा नदीघाटावर कुठलीही सोयीसुविधा नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
वैनगंगा नदीच्या काठावर प्रेत घेऊन जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. मोठमोठे दगड कच्च्या रस्त्यात आहेत. यातूनच मार्ग काढून नदीकाठावर जावे लागते. शिवाय पुलाजवळ ट्रॅक्टरने लाकडे आणून टाकले जातात. नागरिकांना एक-एक लाकूड उचलून नदीकाठाकडे घेऊन जावे लागते. त्यानंतर काठावर सरण रचल्या जाते. मिळेल त्या दगडावर नागरिक बसतात. उन्हाळ्यात तर काही नागरिक पुलाजवळ व रस्त्यावर झाडाखाली सावली पाहून थांबतात. उन्हाळ्यात उन्हाचे चटके खात उभे राहावे लागते. पावसाळ्यात सुद्धा भिजावे लागते. शेड उभारावे, अशी मागणी हाेत आहे.