धान्य खरेदीस शिक्षकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:57 PM2017-10-08T23:57:32+5:302017-10-08T23:57:44+5:30
माध्यान्ह भोजन योजनेसाठी मुख्याध्यापकांनी धान्य खरेदी करून त्याची बिले शासनाकडे जमा करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : माध्यान्ह भोजन योजनेसाठी मुख्याध्यापकांनी धान्य खरेदी करून त्याची बिले शासनाकडे जमा करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र या निर्णयाचा शिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी विरोध केला असून याबाबत महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेतर्फे ग्रामविकास मंत्री तसेच शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदन पाठविले आहे.
शाळेतील प्रशासकीय कामे आॅनलाईन करण्यासाठी नेट सुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षकांना खासगी नेट कॅफेधारकाकडून शैक्षणिक कामे करून घ्यावी लागत आहे. याचा भूर्दंड शिक्षकांना सोसावा लागत आहे. आॅनलाईन कामे करण्यासाठी प्रत्येक शाळेला संगणक तज्ज्ञ व इंटरनेटची व्यवस्था करून द्यावी, शिक्षण विभागाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील संवर्ग १ व संवर्ग २ मधील पोर्टलमध्ये अर्ज न भरणाºया शिक्षकांना आॅनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्या मार्फत पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सत्यम चकिनारप, जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, कार्याध्यक्ष प्रमोद खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत शेंडे, माध्यमिक विभागाचे विजय साळवे, मोहन देवकते, मलय्या रत्नगिरी, सुरेंद्र धकाते, सुरेश धुळसे, एस.पी. मेश्राम, श्रीरंग नरोटे यांच्यासह महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.