रेशीम केद्रांतून राेजगार निर्मितीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:37+5:302021-08-21T04:41:37+5:30

आरमोरी रेशीम रोपवनास विकास अधिकाऱ्यांची भेट जोगिसखरा : आरमोरी येथील रेशीम विकास केंद्रांच्या अंडीपूंज निर्मिती विस्तार रोपवनास नागपूर विभागाचे ...

Opportunity to create employment through silk centers | रेशीम केद्रांतून राेजगार निर्मितीची संधी

रेशीम केद्रांतून राेजगार निर्मितीची संधी

Next

आरमोरी रेशीम रोपवनास विकास अधिकाऱ्यांची भेट

जोगिसखरा : आरमोरी येथील रेशीम विकास केंद्रांच्या अंडीपूंज निर्मिती विस्तार रोपवनास नागपूर विभागाचे विकास अधिकारी टी. एस. पाडवी यांनी भेट दिली.

शासकीय स्तरावरून अंडीपूंज निर्मिती विस्ताराबाबत चौकशी व शहानिशा करून रेशीम उत्पादन वाढविण्याकरिता रेशीम अळ्यांचे संगोपन व व्यवस्थापनावर अधिक लक्ष देऊन टप्प्या-टप्प्याने कच्च्या मालात भर घालावी. रेशीम केंद्रातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून शासकीय व्यवस्थापनातून उच्च प्रतीची रेशीम निर्माण करण्याकरिता अधिकाऱ्यांनी तत्पर राहण्याचे आवाहन केले. १० हेक्टर जागेमधील शासकीय अंडीपूंज व रेशीम निर्मिती रोपवनाचे संपूर्ण निरीक्षण केले. यावेळी सहायक लेखा अधिकारी नागपूर विसपुते, वरिष्ठ तांत्रिक सहायक आरमोरी सी. व्ही. विठ्ठले, रेशीम क्षेत्र सहायक गिरीश ऊईके उपस्थित हाेते.

Web Title: Opportunity to create employment through silk centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.