आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेशाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:12 IST2025-01-17T15:10:41+5:302025-01-17T15:12:50+5:30
Gadchiroli : २५ टक्के प्रवेश राहणार मोफत, इंग्रजी शाळेत सुविधा

Opportunity for free admission to English medium schools under RTE
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने १४ ते २७ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे.
आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी झाली आहे. याकरिता पाल्यांच्या मोफत प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
या संकेतस्थळाला भेट द्या
पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी स्टुडंट महाराष्ट्र या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून मोफत प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी केले आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.