सेंद्रिय शेती प्रमाणिकरणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:12 AM2019-02-09T01:12:00+5:302019-02-09T01:12:35+5:30
भारत सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशात पारंपरिक कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादकांना सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारत सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशात पारंपरिक कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादकांना सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
५० एकरावरील सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहे. या उत्पादक शेतकºयांची भारताच्या सहभागी हमी प्रमाणिकरण प्रणालीअंतर्गत प्रमाणिकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पाच हजार एकरांवर प्रमाणिकरणाचे काम करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेती उत्पादक शेतकºयांची गोफ्स ही उत्पादक कंपनी निर्माण झाली आहे. या कंपनीअंतर्गत सेंद्रीय शेतमालासह चांगली मागणी व भाव मिळत आहे. या योजनेची व्याप्ती व लोकप्रियता लक्षात घेता, योजनाबाह्य शेतकºयांची सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाकरिता मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. त्याअनुषंगाने प्रमाणिकरण प्रणालीचे अधिकृत प्रादेशिक परिषद म्हणून प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली यांची राष्ट्रीय सेंद्रीय शेती केंद्र गाजियाबाद यांच्याकडे नोंद आहे.
शेतीवर आधारित उत्पादने, गौणवनोपज, पशुपालन, मत्स्य उत्पादने आदींसह सेंद्रीय उत्पादन प्रक्रिया केंद्र यांचे प्रमाणिकरण करण्याकरिता आदेशित केले आहे. सेंद्रीय शेती प्रमाणीकरण हे वैयक्तिक व त्रयस्त संस्थेमार्फत केल्यास त्याला अधिक खर्च येतो. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील शेतकरी गटांना अत्यल्प दरात व सुलभरित्या प्रमाणिकरण करण्याकरिता तालुकास्तरीय कृषीविभाग अधीनस्त आत्मा यंत्रणेचे कर्मचारी किंवा प्रकल्प संचालक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
किमान पाच सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी यांचे गट तयार करूण त्यांची नोंद प्रकल्प संचालक गडचिरोली कार्यालयास करणे क्रमप्राप्त आहे. अधिक माहितीकरिता आत्माच्या कार्यालयातील श्रीकांत कापगते यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी केले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ.संदीप कºहाडे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर हजर होते.