वंचित आघाडीत तरुणांना राजकारणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:42 AM2021-08-20T04:42:46+5:302021-08-20T04:42:46+5:30
शहरातील ग्रामसेवक भवन येथे १५ ऑगस्ट राेजी ‘युवा जोडो अभियाना’अंतर्गत आयोजित संवाद बैठकीदरम्यान ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीचे प्रमुख ...
शहरातील ग्रामसेवक भवन येथे १५ ऑगस्ट राेजी ‘युवा जोडो अभियाना’अंतर्गत आयोजित संवाद बैठकीदरम्यान ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष प्रा. हंसराज बडोले व जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे उपस्थित होते.
यावेळी कोषाध्यक्ष गजानन बारसिंगे, महासचिव रत्नघोष नानोरीकर, सचिव देवानंद दुर्गे, सचिव भास्कर झाडे, सचिव पितांबर रामटेके, संघटक जगन्नाथ बंसोड, चामोर्शी तालुका अध्यक्ष मंगलदास चापले, ग्रामपंचायत सदस्य छोटू दुर्गे, तंमुस अध्यक्ष दिनेश डोंगरवार, सामाजिक कार्यकर्ते सुनील आमटे, मनोज घायवान, युवा कार्यकर्ते पंकज साखरे, शेखर उंदिरवाडे, अंकुश मेश्राम, सौरभ फुलझेले, कैलास साखरे, सुधाकर रामटेके, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे यांनी केले, तर आभार महासचिव केशव सामृतवार यांनी मानले.