फिट इंडिया मुव्हमेंटमध्ये जिल्ह्यातील शाळांना सहभागी हाेण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:29 AM2020-12-26T04:29:00+5:302020-12-26T04:29:00+5:30
गडचिराेली : केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाने फिट इंडिया मुव्हमेंट सुरू केली आहे. या मुव्हमेंटमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच माध्यम ...
गडचिराेली : केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाने फिट इंडिया मुव्हमेंट सुरू केली आहे. या मुव्हमेंटमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी हाेण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित शाळांना २७ डिसेंबरपर्यंत नाेंदणी करता येणार आहे.
प्रत्येक विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या फिट असावा. व्यायामाचे महत्व त्याच्या लक्षात यावे, राेगप्रतिकारक क्षमता वाढावी, यासाठी फिट इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आपल्या शाळेची नाेंदणी करण्यासाठी वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नाेंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काेराेनाचे संकट असतानाही बहुतांश शाळांकडून याबाबतची नाेंदणी केली जात आहे.
बाॅक्स
शारिरिक शिक्षणासाठी शिक्षकच प्रभारी
पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षकाचे पद मंजूर आहे. मात्र बऱ्याच शाळांमध्ये या शिक्षकाकडे इतर विषय शिकविण्याची जबाबदारी दिली जाते. तसेच शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला विद्यार्थी केवळ पटांगणात फिरत राहतात. त्यांना खेळांविषयी मार्गदर्शन केले जात नाही.
दरदिवशी अर्धा तास व्यायामासाठी आवश्यक
प्रत्येक शाळा महाविद्यालयाने दरदिवशीच्या वेळापत्रकात अर्धा तास व्यायाम व खेळासाठी राखून ठेवण्याचे निर्देश क्रीडा विभागामार्फत देण्यात आले आहे. तसेच फिट इंडिया स्कूल विक, फिट इंडिया प्रभातफेरी, फिट इंडिया सायक्लाेथाॅन या उपक्रमांचे आयाेजन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर करायचे आहे. या सर्व उपक्रमांचे फाेटाे फिट इंडियाच्या वेबसाईटवर टाकता येणार आहे. ज्या शाळांनी सायक्लाेथाॅन, प्रभातफेरी व व्यायाम आदी उपक्रम राबविले आहेत. त्यांनी ५ जानेवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरही जे उपक्रम घेतले जातील, त्यांचे फाेटाे स्वीकारले जाणार आहेत.