दीड हजारवर विहिरींच्या कार्यारंभाचा आदेश

By admin | Published: March 18, 2017 02:15 AM2017-03-18T02:15:05+5:302017-03-18T02:15:05+5:30

११ हजार धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ४ हजार ५०० सिंचन विहीर बांधण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे.

Orders for operation of wells in one and a half thousand | दीड हजारवर विहिरींच्या कार्यारंभाचा आदेश

दीड हजारवर विहिरींच्या कार्यारंभाचा आदेश

Next

९१ लाखांचे अनुदान अदा : ११ हजार धडक सिंचन विहीर कार्यक्रम; फेब्रुवारीनंतर कामाला गती
गडचिरोली : ११ हजार धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ४ हजार ५०० सिंचन विहीर बांधण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. यापैकी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने १ हजार ५६३ सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश प्रदान केले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या धानपट्ट्यातील पाच जिल्ह्यांसाठी विशेष बाब म्हणून ११ हजार धडक सिंचन विहीर आखला. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. सदर कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक ४ हजार ५०० सिंचन विहीर बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले. या योजनेची अंमलबजावणी सिंचन विभागामार्फत सुरू आहे. या विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या उपविभागात सिंचन विहिरींचे कामे प्राधान्याने घेण्यात आली आहे. सिंचन विहिरीसाठी जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून एकूण ८ हजार २३२ शेतकऱ्यांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी ६ हजार २१५ लाभार्थ्यांच्या अर्ज व दस्तावेज तपासणी करण्यात आली. परिपूर्ण व आवश्यक कागदपत्र जोडणाऱ्या २ हजार ८२३ लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हास्तरीय समितीतर्फे मंजूर करण्यात आले. यापैकी ३ हजार ७८२ लाभार्थ्यांना भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने प्रमाणपत्र दिले. त्यानंतर ५६८ विहिरीच्या कामास प्रशासकीय तर १ हजार ७७९ विहिरींच्या कामास तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. सिंचन विहीर बांधकामासाठी मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण ९१.९३ लाख रूपयांचे अनुदान दिले आहे. सन १९८० च्या वनकायद्यान्वये गडचिरोली जिल्ह्यात अनेक मोठे मध्यम सिंचन प्रकल्प गेल्या १० वर्षांपासून रखडले आहेत. काही सिंचन प्रकल्प अपूर्ण स्थितीत आहे. अशा परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने विशेष करून धडक सिंचन विहीर, शेततळे व जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर केली आहे. या कामातून रबी व खरीप या दोन्ही हंगामात येथील शेतकरी भाजीपाला व इतर दुबार पिके घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक विहिरी
गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असलेल्या चामोर्शी तालुक्यात गावांची व शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. चामोर्शी तालुक्याला ११ हजार धडक सिंचन विहीर कार्यक्रमातून सर्वाधिक ४८५ सिंचन विहीर बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या तालुक्यात सिंचन विहिरीच्या लाभासाठी १ हजार १६२ शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. त्याखालोखाल मुलचेरा तालुक्याला ४६५, अहेरी ४५५, गडचिरोली ४३५, धानोरा ४३५, देसाईगंज १४०, आरमोरी ४००, कुरखेडा ४२५, कोरची ३४५, भामरागड २६५, सिरोंचा ३५५ व एटापल्ली तालुक्याला ३५५ सिंचन विहीर बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

१२४ विहिरींना लागले पुरेसे पाणी
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात १ हजार ५६३ सिंचन विहिरींच्या कामास कार्यारंभ आदेश दिले आहेत. यापैकी आतापर्यंत ७३३ विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे. यापैकी १२४ विहिरींना पुरेसे पाणी लागले असून त्या संदर्भाचा अहवाल जि.प.च्या लघु सिंचन विभागाने तयार केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाण्याची पातळी चांगली असल्याने २५ ते ३० फुटावरच विहिरीला पाणी लागते. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे येथील विहिरींना बोअर मारण्याची गरज पडत नाही. केवळ विहिरीच्या भरवशावरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.

 

Web Title: Orders for operation of wells in one and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.