सेंद्रिय किसान सेवा केंद्र बचत गटातील महिलांच्या सेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:24 AM2021-07-21T04:24:38+5:302021-07-21T04:24:38+5:30
जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना शेती करिता संपूर्ण पिकांबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच १०० टक्के सेंद्रिय शेतीचे ...
जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना शेती करिता संपूर्ण पिकांबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच १०० टक्के सेंद्रिय शेतीचे उत्पादन भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणार असून के. सी. एम. कंपनीचे सेंद्रिय उत्पादन बचत गटातील गरीब व गरजू महिलांना शेतीकरिता माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाला माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, तेजोमय लोक संचालित साधन केंद्र वडसा येथील उपाध्यक्ष रजनी भजनकर, समता महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष इंदिरा दोनाडकर, साधन केंद्राचे लेखापाल देवेंद्र दिवटे, सर्व सहयोगिनी, तथा बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक कुंदा मामीडवार, संचालन अनिता चौधरी यांनी केले तर आभार अर्चना मेश्राम यांनी केले.