शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:14 PM2018-10-29T22:14:32+5:302018-10-29T22:15:10+5:30
शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावांमध्ये ‘कृषी कल्याण अभियान-२ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत पुलखल येथे सोमवारी कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी डॉ.देवघरे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर काथोड, डॉ.विक्रम एस.कदम, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, डॉ.पडोळ, पशुसंवर्धन तज्ज्ञ डॉ.रामटेके, पुलखलच्या सरपंच रेखा शेडमाके, तंमुस अध्यक्ष आनंदराव ठाकरे, श्यामराव चापले, पिपराम भगत, बाबुराव सारवे, मिरा रेचनकर, खुशाल ठाकरे, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.बाबुराव सारवे व प्रतिभा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले.